जगातील वाघांबद्दल माहिती

जगातील वाघांबद्दल माहिती

  • जगातील वाघांच्या संख्येत 100 वर्षात प्रथमच वाढ
  • अहवाल सादर : 11 एप्रिल 2016
  • ‘जागतिक वन्यजीव निधी व ग्लोबल टायगर फोरम’ ही आकडेवारी जाहीर केली.
  • ही आकडेवारी 2014 च्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र गणनेवर आधारित आहे.
  • जगात सध्या 3890 वाघ आढळून आलेत.
  • 2010 मध्ये 3200 वाघांची संख्या होती.

 

देशनिहाय गणती –

  • देश – वाघांची संख्या
  • भारत – 2226
  • रशिया – 433
  • इंडोनेशिया – 371
  • मलेशिया – 250
  • नेपाळ – 198
  • थायलंड – 189
  • बांग्लादेश – 106
  • भूतान – 103

 

  • 13 आशियाई देशाची तिसरी व्याघ्र संवर्धन परिषद दिल्ली येथे 12 ते 14 एप्रिल 2016 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचा उद्देश कमी असलेल्या देशामध्ये वाघाची संख्या वाढविणे हा होता.
  • भारत सरकारने ‘प्रोजेक्ट टायगर’ साठी 380 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
  • महाराष्ट्रात सध्या 190 वाघ आहेत. त्यात विदर्भाचा 167 वाघांचा समावेश आहे. उर्वरित 23 वाघ पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री प्रकल्पात आहे.
  • भारतात 1973 साली व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • सुंदरबन (पं.बंगाल) पांढरा पट्टेरी वाघ आहेत.
  • तिसर्‍या व्याघ्र संवर्धन परिषदेत कान्हा, सातपुडा (मध्य प्रदेश), ताजीरंगा (आसाम), परमविकुलम व पेरियार (केरळ) या अभयारण्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
  • पहिली व्याघ्र संवर्धन परिषद रशिया येथे पार पडली (2010)
  • 2016 मध्ये दिल्ली येथे झालेल्या तिसर्‍या परिषदेत वाघांचे जतन, संवर्धन याबाबत तंत्रज्ञाना सह सर्व परस्पर सहकार्य संबंधी जाहीरनामा तयार करण्यात आला. तो जाहीरनामा दिल्ली जाहीरनामा म्हणून ओळखला जाणार आहे. या जाहीरनाम्यावर 13 आशियाई देशांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.