जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांबद्दल माहिती
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांबद्दल माहिती
- जागतिक आरोग्य संघटनेने जगातील हवेच्या दर्जा बाबत 3000 शहरांचा अभ्यास करून सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली 15 मे 2016. यामध्ये इराण मधील झाबेला हे सर्वाधिक जगातील प्रदूषित शहर होय.
- पहिल्या 10 मध्ये भारताच्या 4 शहरांचा समावेश आहे.
- ग्वालहेर (दूसरा), अलाहाबाद (तिसरा), पटना (चौथा), रायपूर (पाचवा) क्रमांकावर आहे. दिल्ली यादीत 9 व्या स्थानावर आहे.
- मागच्या वर्षीच्या अहवालात (2014-15) दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर होते.
- मागच्या अहवालात (20 पैकी 13 प्रदूषित शहरे भारताची होती. पहिल्या पाच शहरामधील हवेचा घातक अशी pm 2.5 चे प्रमाण आत्याधिक आहे. झाबोला मधील pm 2.5 चे प्रमाण 217 इतके आहे. या यादीत 103 देशांचा अभ्यास करण्यात आला. PM म्हणजे Particulate Matter (धुळीचे कण)
जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक –
- ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकाच्या 168 देशांच्या यादीत भारत 76 व्या क्रमांकावर (मागील वर्षी 85 व्या स्थानावर होता)
- जागतिक बँक व आशिया विकास बँकेच्या माहितीच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो.
- 168 देशांच्या यादीत डेन्मार्क सर्वोच्च स्थानी लागोपाठ दुसर्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे.
- 1 ला-डेन्मार्क, 2 रा-फिनलंड, 3 रा-स्वीडन, 4 था-न्यूझीलँड, 5 वा-नेदरलँड