जागतिक कृषी नेतृत्व पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

जागतिक कृषी नेतृत्व पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

 • 11वी जागतिक कृषी नेतृत्व शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली.
 • 2008 पासून भारतीय अन्न व कृषी परिषद केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्या मदतीने ही परिषद आयोजित करते.
 • या परिषदेत जागतिक विश्व कृषी नेतृत्व पुरस्कार (Global Agriculture Leadership Award) ची घोषणा करण्यात आली.

jagatik krushi netrutv puraskar 2018

पुरस्कार विजेते –

 • सर्वोत्कृष्ट मत्स्यपालन करणारे राज्य: झारखंड.
 • सर्वोत्कृष्ट पशुपालन करणारे राज्य: बिहार.
 • सर्वोत्कृष्ट फलोत्पादन करणारे राज्य: नागालँड.
 • सर्वोत्कृष्ट शेती करणारे राज्य: गुजरात.
 • पॉलिसी लीडरशिप पुरस्कार: एन. चंद्राबाबू नायडू.
यावर्षी पहिल्यांदा जागतिक कृषी पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार एम.एस. स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय अन्न व कृषी परिषदेच्या वतीने देण्यात येतो. हा पुरस्कार व्यक्ति अथवा संस्थेला देण्यात येतो. विशेषत: आशिया, आफ्रिका व द. अमेरिका खंडातील कृषीमध्ये आमुलाग्र बादल घडवून आणणार्‍या व्यक्तिला दिला जातो.

डॉ. स्वामीनाथन यांच्या विषयी माहिती –

 • भरातील हरित क्रांतिचे जनक.
 • UNEP (United Nationas Environment Programme) कडून “Father of Economic Ecology” म्हणून गौरव.
 • भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक: 1972 ते 1979.
 • केंद्रीय कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव: 1979 ते 1980.
 • आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक: 1982 ते 1988.
 • 1999 साली टाइम मॅगझीनव्दारा आशियातील सर्वात प्रभावशाली 20 व्यक्तीच्या यादीत समावेश. (यामध्ये महात्मा गांधी व रविंद्रनाथ टागोर यांचा समावेश).
 • अन्न व कृषी संघटना (रोम)चे प्रमुख: 1981 ते 1985.

त्यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रकारे –

 • 1987: पहिला जागतिक अन्न पुरस्कार.
 • 1989: पद्मविभूषण पुरस्कार.
 • 1972: पद्मभूषण पुरस्कार.
 • 1971: रेमन मॅगसेसे पुरस्कार.
 • 1967: पद्मश्री पुरस्कार.
 • 1961: शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.