इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स

Indian Elecricity Rules

इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स

 • सप्लाय कंपनीच्या अर्थ किंवा न्यूट्रल शिवाय सर्व तारांना आयर्न ल्काड कट औट बसवावेत.
 • जे ग्राहक मेडियम व हाय व्होल्टेज चा वापर करतात त्यांनी स्वत:ची अर्थींग करणे आवश्यक आहे.
 • मेडियम किंवा हाय व्होल्टेज च्या ठिकाणी धोक्याची सूचना सहज दिसेल अशा प्रकारे इंग्रजी, हिंदी व स्थानीक भाषेत लावावी.
 • जुन्या वायरिंग मधील बदल व नवीन वायरिंग परवानाधारक इलेक्ट्रिक कॉन्ट्राक्टर कडूनच करून घ्यावे.
 • मंडलामध्ये प्लगपीन सॉकेट थ्री पीन प्लगचा वापर करावा.
 • मंडलाची नवीन विद्युत पुरवठा करण्यापूर्वी आर्थींगची तपासणी करावी.
 • मंडलातील लिकेज करंट लोड करंटच्या 1/5000 पेक्षा कमी असावा.
 • ग्राहकाने नवीन मंडलाच्या सुरूवातीस ICDP किंवा ICTP इ. साधने सहज हाताळता येतील अशा ठिकाणी बसवावे.
 • प्रत्येक उपमंडलात योग्य आकाराचे स्वतंत्र कटऔट बसवावे.
 • पॉझीटीव्ह वार कोणत्याही परस्थितीत उघडे ठेवू नये.
 • वायरिंग संबंधीत प्रत्येक धातूचे साधने/उपकरणे योग्य पद्धतीने अर्थ करावे.
 • विद्युत पुरवठा, कंपनीच्या साधनांची देखभाल ग्राहकाने ठेवावी. उदा. एनर्जी मीटर इ.
 • विद्युत कंपनीने स्वत:च्या मालकीच्या साधनांना सील केल्यास सीलची देखभाल ग्राहकाने करावी अधिकृत इसमाशिवाय सील तोडणे गुन्हा आहे.
 • थ्री फेज फोर वायर पद्धतीतील  न्यूट्रल कंडक्टर अर्थ करावा.
 • D.C. विद्युत पुरवठ्याच्या तीनतारी पद्धतीत मधली वायर अर्थ करावी.
 • इंस्टॉलेशन टेस्टिंग रिपोर्ट शिवाय मंडलास सप्लाय देवू नये.
 • प्रत्येक स्वीच बोर्डच्या समोर 3’6” अंतर असावे.
 • सर्व्हिस मेन्स सीडी शिवाय हाताला येणार नाही अशा उंच असाव्यात. त्या वेदरप्रूफ व वाटर प्रूफ असाव्यात.
 • अर्थ कंडक्टर कॉपरचा असून मंडलातील जास्तीत जास्त प्रवाहाच्या दुप्पट प्रवाह सुरक्षीत वाहून नेईल असा असावा.
 • मेडियम व्होल्टेजची वायरिंग करताना थ्रेडेड कॉन्ड्यूटर पाइप मधून करावे व कॉन्ड्यु पाइपला अर्थींग करावे.
 • केसींग, कॅपींग, वायरिंग प्लास्टरमध्ये बुजवु नये व त्यांचा संबंध पाण्याशी येवू नये.
 • लेड कव्हर वायरिंगला अर्थ करावे व त्याला लाकडाचे किंवा लोखंडाचे अच्छादन असावे.
 • फ्लेग्झीबल वायरचा उपयोग टांगते दिवे, पोर्टेबल उपकरणे व तात्पुरत्या वायरिंग साठीच करावा.
 • फ्लेग्झीबल वायर जेथे जोडल्या असतील तेथे कार्ड ग्रीप्सची (गाठीची) सोय करावी. ज्यामुळे कनेक्टिंग लोड/टर्मिनलवर तान येणार नाही.
 • स्वीच प्लग जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावे.
 • नवीन इंस्टॉलेशनची मेगर टेस्ट 1 मेगा ओहम पेक्षा कमी असल्यासच विद्युत पुरवठा करावा.
 • हाउस वायरिंगमध्ये डिस्ट्रिब्युशन बोर्डच्या प्रत्येक सर्किटमध्ये 3 अॅम्पीयर पेक्षा कमी लोड असावा.
 • फेज वायर नेहमी स्वीच मध्येच जोडावी.
 • निगेटिव्ह वायरवर फ्यूज बसवू नये न्यूट्रल लिंक वापरावे.
 • तीन फेज A.C. वायरिंग असेल तर फेजसाठी लाल, पिवळी व निळ्या रंगाची वायर व न्यूट्रलसाठी काळ्या रंगाची वायर वापरावी.
 • D.C. पद्धतीत वायरिंग करताना भिन्न पोलॅरिटीचे वायर्स वेगवेगळ्या पाइप मधून न्यावे.
You might also like
1 Comment
 1. swati says

  nice information

Leave A Reply

Your email address will not be published.