गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्याबद्दल माहिती
गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्याबद्दल माहिती
- प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी 25 नोव्हेंबर 1915 रोजी व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला (2015 मध्ये सिद्धांताला 100 वर्ष पूर्ण) ही सिद्धांत मांडतानाच त्यानी गुरुत्वीय तरंगाचे अस्तित्व मांडले होते.
- त्याचा शोध लेसर इंटरफेरोमीटर ग्राव्हिटेशनल व्हेव्ह ऑब्झरव्हेटरी मार्फत (लायगो) घेण्यात आला (11 फेब्रु. 2016) आपल्याला जे विश्व दिसते. ते केवळ पाच टक्के आहे. उर्वरित 95 टक्के विश्वातील प्रकाश किरणांनी आपण संपर्क प्रस्थापित करू शकत नाही.
- मात्र तेथील गुरुत्वीय लहरी संपर्क साधतात ए आइनस्टाईन यांनी सिद्धांतात म्हटले आहे. मात्र या लहरी आपल्याला सापडू शकल्या नव्हत्या.
- ‘लायगो’ च्या माध्यमातून ह्याचा शोध घेण्यात आला. (11 फेब्रु. 2016)
गुरुत्वीय लहरी म्हणजे –
- अवकाशातून जाणार्या एखाद्या महाकाय वस्तूमुळे किंवा अवकाशात झालेल्या प्रचंड मोठ्या टकरींमध्ये तरंग (लहरी) निर्माण होतात.
या तरगांना किंवा लहरींना गुरुत्वीय लहरी म्हणतात. दोन न्यूट्रोन तारे किंवा कृष्ण विवरांच्या एकमेकांभोवती फिरण्यातून तार्यांच्या स्फोटामुळे निर्माण होणार्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व प्रयोगशाळेत मोजता येऊ शकते असे शास्त्रज्ञांना वाटते.
शोधाचा फायदा –
- ‘स्मार्टफोन’ मधील जीपीएस तंत्रज्ञान अधिक अचूक होऊ शकेल.
- स्थिर लेसर तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला फायदेशीर – स्लडलेस सर्जरी, हाय परफॉर्मन्स कम्युटिंग यासाठी फायदा.
- मोठया अवकाश मोहिमासाठी उपयोगी भविष्यात खगोल संशोधन बळकट होणार.
शोधात भारतीयांचा सहभाग –
- ‘आयुला’ (आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल भौतिकी केंद्र) चे सुकांत बोस सौधिल राजा, राजेश नायक, ITT गांधी नगर प्रा. आनंद सेनगुप्ता, आयसर संस्था (केरळ) प्रा. अर्चना पै. टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई चे सी.एस. ऊंनीकृष्णन, चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे केजी अरुण बंगळूरचे पी.अजित, कोलकत्ताचे राजेश नायक, इंस्टिट्यूट ऑफ (लाझमा रिसर्चचे झियाउद्दीन खान यांचा या प्रयोगात महत्वाचा सहभाग होता.)
- जगात फक्त गुरुत्वीय लहरी संबंधी लेजर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय तरंग वेधशाळा अमेरिकेत लुसीयाना व वाशिंग्टन येथे आहेत.
- एक अब्ज तीस कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील कृष्ण विवराच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरीतून पृथ्वीवर आलेल्या लहरींनी अमेरिकेतील ‘लायगो’ वेधशाळेच्या शोधकांत अत्यंत सूक्ष्म अणूतील धनप्रभारीत नोंद झाली. ही घटना 14 सप्टें. 2015 ला घडली. या प्रयोगातून गुरुत्वीय लहरींच्या शोधाचा निघालेला निष्कर्ष 1 फेब्रु. 2016 ला जाहीर झाला. या शोधात ‘गुरुत्वीय लहरींचा खगोलशास्त्र’ या भौतिकशास्त्रात नवीन शाखा निर्माण झाली.