गुणोत्तर व प्रमाण यांच्या विषयी संपूर्ण माहिती

                                गुणोत्तर व प्रमाण यांच्या विषयी संपूर्ण माहिती

 • दोन किवा त्यापेक्षा अधिक सजातीय राशींची केलेली तुलना म्हणजे गुणोत्तर होय.
 • ज्या राशींचे गुणोत्तर काढायचे त्यांची एकके समान करून घ्यावीत.
 • गुणोत्तर हा समान एकके असलेल्या राशींचा भागाकार असतो म्हणून त्यास एकके नसतात.
 • A व B या दोन संख्यामध्ये A चे B शी असलेले गुणोत्तर A/B or A:B असे लिहावे.
 • तसेच B चे A शी असलेले गुणोत्तर B/A or B:A

Must Read (नक्की वाचा):

संपूर्ण संख्याशास्त्र

Ex. 50cm चे 2m शी गुणोत्तर

2m = 2*100 = 200

50/200 = 1/4 = 1:4

A,B,C,D ह्या चार संख्या A:B=C:D अशा पद्धतीने असतील म्हणजे त्या चार संख्या A/B = C/D प्रमाणात असतात.

 • हिली आणि शेवटची संख्या यांना अंत्यपदे म्हणतात.
 • आणि मधल्या दोन संख्यांना मध्यपदे म्हणतात.
 • (Note: अंत्यपदांचा गुणाकार=मध्यपदांचा गुणाकार जेव्हा त्या संख्या प्रमाणात असतील तेव्हा)
 • ex. 2,4,6,12

2/4 = 6/2

1/2 = 3/1

A,B,C ह्या तीन संख्या प्रमाणात असतील म्हणजे त्या तीन संख्या A/B = B/C = B2=AC

 • (Note: मध्यपदाचा वर्ग=अंत्यपदांचा गुणाकार जेव्हा त्या संख्या प्रमाणात असतील तेव्हा)
  ex. m,100,250 ह्या प्रमाणात आहेत तर m=?

(100)2=m*250

1000=250*m

m=1000/250=40

दोन संख्यांची बेरीज A असते व वजाबाकी B असते तेव्हा त्या दोन संख्येचे एकमेकांशी गुणोत्तर

A+B/A-B

अपूर्णाकाचे गुणोत्तर :

गुणोत्तर म्हणजे भागाकर असतो त्यामुळे अपूर्णाकाचे गुणोत्तर काढतांना पहिला अपूर्णाक तसाच ठेवून दुसर्‍या अंकाचा गुणाकार व्यस्त घ्यावा व गुणाकार करावा.

ex.2/3 चे 5/7

2/3*7/5 = 14/15

दशांश अपूर्णाकाचे गुणोत्तर :

दशांश अपूर्णाकाचे गुणोत्तर काढतांना त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर समान अंक करून घ्यावे आणि मग दशांश चिन्ह काढून मग संक्षिप्त रूप द्यावे.

ex. 0.25 चे 0.3

25 / 30 = 5:6

दोन समभुज त्रिकोणाच्या बाजू/दोन चौरसाच्या बाजू/दोन वर्तुळाच्या त्रिज्या यांचे प्रमाण A:B असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे प्रमाण A2: B2असते.

 • ex. समभुज त्रिकोणाच्या बाजू = 4:5

क्षेत्रफळाचे प्रमाण (4)2:(5)2 =16:25

दोन घनांच्या बाजूचे प्रमाण/दोन गोलांच्या त्रिज्येचे गुणोत्तर तर त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर A3:B3

ex. दोन घनांच्या बाजूचे प्रमाण 6:7

घनांचे प्रमाण (6)3: (7)3 = 36:49

 उदाहरणे :

नमूना पहिला
उदा. 9/15=x/70;  ∶:  x=?

 • 128
 • 42
 • 39
 • 56

उत्तर : 42

नियम :-
a/b=c/d   तर ad×bc
उदा.दिल्याप्रमाणे 9/15=X70=15x=9×70 ;
∶: x =9×70/15=42 किंवा
∷9/15=x/70
3×14/5×14= 42/70
(3:5 या प्रमाणात अंश व छेद आहेत)

नमूना दूसरा
उदा. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती?

 • 22/7:1
 • 7:22
 • 4:5
 • 5:4

उत्तर : 4:5

स्पष्टीकरण :-
(परिघांचे गुणोत्तर=त्रिज्यांचे गुणोत्तर)

नमूना तिसरा –
उदा. एका त्रिकोणाच्या बाहयकोनांच्या मापांचे गुणोत्तर 3:7:8 आहे.; तर त्या त्रिकोणाच्या आंतर कोनांपैकी सर्वात मोठा कोन किती मापाचा असेल?

 • 1800
 • 1440
 • 1600
 • 1200

उत्तर : 1200

स्पष्टीकरण :-
त्रिकोणाच्या बाह्य कोनांची बेरीज = 3600. सूत्रांनुसार 3+7+8=18 भाग = 3600
:: 1 भाग = 200, लहान बाह्यकोनाचा आंतरकोन मोठा असतो.
लहान बाहयकोन = 3×20=600
मोठा आंतरकोन = 180-60 = 1200

नमूना चौथा –
उदाविनू व सदू यांच्या वयांचे गुणोत्तर 5:3 आहे, सदू व मधु यांच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे, तर विनू व मधू यांच्या वयांचे गुणोत्तरकिती?

 • 9:10
 • 3:7
 • 20:21
 • 20:35

उत्तर : 20:21

क्लृप्ती :-
विनू     सदू     मधू
5     3
4     7
विनू व मधू यांच्या वयांचे गुणोत्तर 20:21
20 : 12 : 21

नमूना पाचवा
उदा. पाच लीटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रवणात 3 लीटर पाणी मिसळविल्यास  नवीन द्रवणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल?

 • 20%
 • 25%
 • 27.5%
 • 30%

उत्तर : 25%

स्पष्टीकरण :
5 लीटरचे 40% = 5+3=8 लीटरचे किती टक्के?
5 चे 40%= 8 चे x%
x% = 5×40/8
= 5×5
= 25%

नमूना सहावा
उदा. पाच लीटर औषधी द्रावणात 6% अल्कोहोल असलेले किती लीटर द्रावण मिळवावे, म्हणजे नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 2% होईल?

 • 3 ली.
 • 2.5 ली.
 • 3.5 ली.
 • 4 ली.

उत्तर : 2.5 ली.

स्पष्टीकरण :-
अल्कोहोल असलेले द्रावण x लीटर मानू.
:: x चे 6%= 5 + x चे 2%
:: 6×x/100= (5+x)×2/100
6x = (5+x) × 2
:: 6x=10+2x
:: 4x=10
:: x =10/4
= 2.5 लीटर

नमूना सातवा
उदा. 12 मिनिटांचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती?

 • 1:20
 • 100:3
 • 20:1
 • 3:40

उत्तर : 20:1

स्पष्टीकरण :-
12 मिनिटे = 12×60
= 720 सेकंद
:: 720:36 = 20:1

नमूना आठवा –
उदा. 12: x : 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर x=किती?

 • 24
 • 21
 • 18
 • 14

उत्तर : 18

स्पष्टीकरण :-
तीन संख्या प्रमाणात असल्यास (मध्य पदाचा)2= अत्यंपदांचा गुणाकार
:: x2=12 × 27
:: x = √4×3×3×9
= 2×3×3
= 18

क्लृप्ती :-
12 ची 3/2 पट
= 18,
18 ची पट 3/2 पट
= 27
Must Read (नक्की वाचा):

विभाजतेच्या कसोट्या

You might also like
3 Comments
 1. Vishal says

  a व b या व्यक्तींच्या पगाराचे गुणोत्तर 4.5 आहे तसेच a व c यांच्या पगाराचे गुणोत्तर 2.3 आहे जर b चा पगार 24000 रू असल्यास c आणि a यांच्या पगारातील फरक किती?

 2. Vivek says

  दोन भावांच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज ही त्यांच्या 10 वर्षानंतरचा वयांच्या 1/6 पट असेल, त्यांच्या आजच्या वयांची बेरीज कीती

 3. Thavre Laxman says

  तिन संख्याचे गुणौत्तर3:4:5आहे त्याची बेरीज 450आहे तर त्या संख्या कोणत्या

Leave A Reply

Your email address will not be published.