भविष्यकाळ व त्याचे उपयोग
Must Read (नक्की वाचा):
साधा भविष्यकाळ (Simple Future Tense) :
- इंग्रजीत भविष्यकाळाविषयी बोलण्याचे अनेक प्रकार आहेत. साधा भविष्यकाळ, going to चे रूप, साधा वर्तमानकाळ इत्यादी.
- ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही अशा गोष्टींविषयी बोलताना साधा भविष्यकाळ वापरतात. हा (भविष्यकाळ) भविष्यातील सत्य व्यक्त करतो.
उदा.
- I shall be twenty next Saturday.
- It will be Diwali in a week.
- We will know our exam results in May.
- भविष्यकाळात जे घडेल असे आपल्याला वाटते किंवा असा विश्वास असतो अशाविषयी बोलताना आपण हा काळ उपयोगात आणतो.
- I think Pakistan will win the match.
- I’m sure Helen will get a first class.
- वरील वाक्याप्रमाणे आपण बरेचदा हा काळ I think आणि I’m sure बरोबर वापरतो. आपण I expect …… I believe ……., Probably …….., असेदेखील म्हणतो.
- बोलत असताना आपण जेव्हा काही ठरवितो तेव्हा आपण या काळाचा उपयोग करू शकतो.
- It is raining. I will take an umbrella.
- “Mr. Sinha is very busy at the moment.” – “All right. I’ll wait.“
Going to
- आपण जेव्हा काहीतरी करावयाचे ठरविलेले असते तेव्हा त्याबद्दल बोलण्याआधी आपण going to (be going to + base at the verb) हे रुप वापरतो.
- “Have you decided what to do?”-“Yes. I am going to resign the job.”
- “Why do you want to sell your motorbike?”-“I’m going to buy a car.
- जेव्हा वर्तमानकाळात असे काहीतरी असते जे आपल्याला भविष्याविषयी सांगते व ते आपल्याला निश्चितपणाचे किंवा संभाव्य आहे असे वाटते अशा गोष्टी सांगतानादेखील आपण going to चा उपयोग करतो.
- It is going to rain; look at those clouds.
- The boat is full of water. It is going to sink.
- She is going to have a baby.
- घडण्याच्या मार्गावर/घडण्याच्या अवस्थेत असलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी going to हे रूप उपयोगात येते.
- Let’s get into the train. It’s going to leave.
- Look ! The cracker is going to explode.
Be about to
- नजीकच्या/लगेचच्या भविष्यकाळासाठी Be about to + base form (क्रियापदाचे मूल रूप) सुद्धा वापरू शकतो.
- Let’s get into the train. It’s about a leave.
- Don’t go out now. We are about to have lunch.
सामान्य वर्तमानकाळ (Simple Present Tense) :
- कार्यालयीन कार्यक्रम किंवा वेळापत्रकासाठी वर्तमानकाळ वापरतात.
उदा.
- The college opens on 23rd June.
- The film starts at 6.30 and finishes at 9.00
- When does the next train leave for Chennai?
- भविष्यकाळासाठी उपवाक्यांमध्ये if, unless, when, while, as (=while), before, after, until, by the time आणि as soon as बरोबर बर्याचदा साधा वर्तमानकाळ वापरतात येथे साधा भविष्यकाळ वापरत नाहीत.
- I won’t go out if it rains. (not : will rain)
- Can I have some milk before I go to bed?
- Let’s wait till he finishes his work.
- Please ring me up as soon as he comes.
चालू वर्तमानकाळ (Present Continuous Tense) :
- भविष्यात करावयाच्या गोष्टी, ज्या ठरविलेल्या किंवा नियोजित केलेल्या आहेत, अशाविषयी बोलताना आपण चालू वर्तमानकाळ वापरतो.
- I am going to Shimla tomorrow.
- We are eating out tonight.
- Mr. Abdul Rehman is arriving this evening.
- वैयक्तिक व्यवस्थेसाठी चालू वर्तमानकाळ (साधा वर्तमानकाळ नव्हे) वापरावा.
चालू भविष्यकाळ (Future Continuous Tense) :
- भविष्यकाळात ज्या क्रिया चालू असतील (घडत असतील) त्यांविषयी बोलताना आपण चालू भविष्यकाळ वापरतो.
जसे –
- I suppose it will raining when we start.
- This time tomorrow I will be sitting on the beach in Singapore.
- “Can I see you at 5 o’clock?”-“Please don’t come then. I will be watching the tennis match on TV.”
- भविष्यकाळातील अशा क्रिया ज्या आधीच ठरविलेल्या किंवा नियोजलेल्या आहेत किंवा दरम्यानच्या काळात घडणे अपेक्षित आहे, त्याविषयी बोलताना आपण हा काळ वापरतो.
उदा.
- I will be staying here till Sunday.
- He will be meeting us next week.
- The postman will be coming soon.
Be to
- कार्यातील पूर्वयोजना/व्यवस्था/तजवीज यांविषयी बोलण्यासाठी आपण be to + क्रियापदाचे मूळ रूप वापरतो.
- The Prime Minister is to visit America next month.
- The conference is to discuss ‘Nuclear Tests.’
- बर्याचदा बातमीपत्रात, Be to औपचारिक पद्धतीत वापरतात; (बातम्यांच्या) मथळ्यांमध्ये बहुतांशी ‘be’ वगळलेले असते.
उदा. Prime Minister to Visit America’
पूर्ण भविष्यकाळ (Future Tense) :
- भविष्यातील काही विशिष्ट/विविक्षित समयी ज्या क्रिया पूर्ण होणार आहेत त्याविषयी बोलताना पूर्ण भविष्यकाळ वापरतात.
जसे –
- I shall have written my exercise by then.
- He will have left before you go to see him.
- By the end of this month I will have worked here for five years.
चालू पूर्ण भविष्यकाळ (Future Perfect Continuous Tense) :
- अशी क्रिया जी काही कालावधीसाठी चालू असेल आणि भविष्यात संपणार/पूर्ण होणार असेल त्या क्रियेसाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरतात.
- By next March we shall have been living here for four years.
- I’ll have been teaching for twenty years next July.
- हा काळ जास्त प्रचलित नाही.