वर्तमानकाळ व भूतकाळ यांचे उपयोग

वर्तमानकाळ व भूतकाळ यांचे उपयोग

Must Read (नक्की वाचा):

काळाची ओळख

वर्तमानकाळ (PRESENT TENSE) :

साधा वर्तमानकाळ (Simple Present Tense) –

  • खालील बाबतीत साध्या वर्तमानकाळाचा (Simple Present Tense) उपयोग होतो.

1. सातत्याने घडणारी (habitual action) क्रिया व्यक्त करण्यासाठी.

उदा.

  1. He drinks tea every morning.
  2. I get up every day at five o’clock.
  3. My watch keeps good time.

2. शाश्वत सत्ये (general truths) व्यक्त करण्यासाठी.

उदा.

  1. The sun rises in the east.
  2. Honey is sweet.
  3. Fortune favours the brave.

3. ‘Here’ आणि ‘there’ ने सुरुवात होणार्‍या उद्गारवाचक वाक्यांमध्ये खरोखरीच वर्तमानात काय घडत आहे हे व्यक्त करण्यासाठी.

उदा.

  1. Here comes the bus!
  2. There she goes!

4. हुबेहूब वर्णनात साध्या भूतकाळाला पर्यायी म्हणून.

उदा.

  1. Soharb now rushes forward and deals a heavy blow to Rustam.
  2. Immediately the Sultan hurries to his capital.

5. निश्चित वेळापत्रक किंवा निश्चित कार्यक्रमाचा भाग असलेली भविष्यातील घटना व्यक्त करण्यासाठी.

जसे-

  1. The next flight is at 7.00 tomorrow morning.
  2. The match starts at 9 o’clock.
  3. The train leaves at 5.20.
  4. When does the coffee house reopen?
  • साध्या वर्तमानकाळाचे इतर काही उपयोगदेखील लक्षात घ्या.

1. अवतरणाला (quotations) सुरुवात करण्याआधी वापरला जातो.

उदा. Keats says, ‘A thing of beauty is a joy forever.’

 

2. काळवाचक किंवा संकेतवाचक उपवाक्यांमध्ये साध्या भविष्यकाळाऐवजी.

उदा.  

  1. I shall wait till you finish your lunch.
  2. If it rains we shall get wet.

3. खेळाचे नभोवाणीवरील समालोचन यांसारख्या घटना, जेथे चालू असतील त्या क्रियांचे वर्णन करताना, कालावधीला महत्व नसून एकामागून एक घडणार्‍या घटनांना जास्त महत्व दिलेले असते. तेथे चालू वर्तमानकाळाऐवजी साधा वर्तमानकाळ वापरतात.

 

4. जी क्रियापदे $ 221 मध्ये उल्लेखलेली आहेत त्या सारख्या क्रियापदांसाठी चालू वर्तमानकाळाऐवजी साधा वर्तमानकाळ वापरतात.

 

चालू वर्तमानकाळ (PRESENT CONTINUOUS TENSE) –

खालील बाबतीत चालू वर्तमानकाळाचा (Present Continuous) उपयोग होतो.

1. बोलताना जी क्रिया चालू आहे त्यासाठी.

उदा.

  1. She is singing (now).
  2. The boys are playing hockey.

2. बोलताना प्रत्यक्ष घडत नसली तरी जी तात्पुरती क्रिया आहे त्यासाठी.

उदा. I am reading ‘David Copperfield’ (पण, मी या क्षणी वाचन करीत नाही आहे.)  

 

3. जवळच्या भविष्यात जी क्रिया घडण्याची आधीच व्यवस्था केली आहे त्या क्रियेसाठी.

उदा.

  1. I am going to the cinema tonight.
  2. My uncle is arriving tomorrow.
  • आधी सांगितल्याप्रमाणे सातत्याने घडणार्‍या क्रियेसाठी साधा वर्तमानकाळ वापरतात. परंतु जेव्हा एखाधा हटवादी सवयीचा उल्लेख करावयाचा असतो, जी सल्ला किंवा ताकीद देऊनही तशीच चालू राहते, तेव्हा आपण always, continually, constantly या सारख्या क्रियाविशेषनांबरोबर चालू वर्तमानकाळाचा उपयोग होतो.
  • My dog is very silly; he is always running out into the road.
  • खालील क्रियापदे त्यांच्या अर्थामुळे सर्वसाधारणपणे चालू काळाचा उपयोग होत नाही.

1. आकलन शक्तीशी (Preception) संबंधित क्रियापदे

उदा. see, haer, smell, notice, recognize.

 

2. स्वरूपाशी (appearing) संबंधित क्रियापदे

उदा. appear, look, seem.

 

3. भावनेशी (emotion) संबंधित क्रियापदे

उदा. want, wish, desire, feel, like, love, hate, hope, refuse, prefer.

 

4. विचाराशी (thinking) संबंधित क्रियापदे

उदा. think, suppose, believe, agree, consider, trust, remember, forget, know, understand, imagine, mean, mind.

 

5. Have = (Possess/स्वामित्व), own, possess, belong to, contain, consist of, be

 

    Wrong(चूक)                                 Right (बरोबर)

  1. These grapes are tasting sour.     These grapes taste sour.
  2. I am thinking you are wrong.       I think you are wrong.
  3. She is seeming sad.                    She seems sad.
  4. He is having a cellular phone.         He has a cellular phone.
  • परंतु वरील यादीतील क्रियापदे चालू काळात वेगळ्या अर्थाने वापरता येतात. –
  1. She is tasting the soup to see if it needs more salt. (taste=test the flavour of)
  2. I am thinking of going to Malaysia. (think of=consider the idea of)
  3. They are having lunch.(have=eat)

पूर्ण वर्तमानकाळ (PRESENT PERFECT TENSE) –

  • खालील बाबतीत पूर्ण वर्तमानकाळाचा (Present Perfect) उपयोग होतो.

1. अगदी जवळच्या भूतकाळात पूर्ण झालेली कार्ये दर्शविण्यासाठी ‘Just’ बरोबर वापरतात.

उदा.

  1. He has just gone out.
  2. It has just struck ten.

2. ज्यांची वेळ दिलेली नाही किंवा निश्चित नाही अशा भूतकाळातील क्रिया व्यक्त करण्यासाठी.

उदा.

  1. Have you read ‘Gulliver’s Travels’?
  2. I have never known him to be angry.
  3. Mr. Hari has been to Japan.

3. जेथे मूळ क्रियेचा विचार करण्यापेक्षा त्याचा वर्तमानात होणारा परिणाम अधिक विचारात घेतला जातो अशा भूतकाळातील घटनांचे वर्णन करण्यासाठी.

उदा.

  1. Gopi has eaten all the biscuits (i.e., there aren’t any left for you).
  2. I have cut my finger (and it is bleeding now)
  3. I have finished my work(=now I am free).

4. भूतकाळातील केव्हातरी सुरू झालेली आणि या क्षणापर्यंत सतत चालू असलेल्या क्रियेचा निर्देश करण्यासाठी (बहुतांशी ‘since’ आणि ‘for’ वाक्यांशी बरोबर येते.)

उदा.

  1. I have known him for a long time.
  2. He has been ill since last week.
  3. We have lived here for ten years.
  4. We haven’t seen Padma for several manths.
  • खालील क्रियाविशेषणे किंवा क्रियावेशेषण वाक्यांशदेखील अपूर्ण वर्तमानकाळी क्रियापदांबरोबर वापरता येतात. (दर नमूद केलेले सोडल्यास) never, ever (in questions only), so far, till now, yet (नाकारार्थात किंवा प्रश्नात) already, today, this week, this month etc.
  • टीप – भूतकाळी क्रियाविशेषांबरोबर कधीच पूर्ण वर्तमानकाळ वापरता येत नाही. आपण असे म्हणायला नको “He has gone to kolkata yesterday” यांसारख्या बाबतीत साधा भूतकाळ पाहिजे. तेव्हा असे म्हणावयास पाहिजे “He went to Kolkata yesterday”.

चालू पूर्ण वर्तमानकाळ (Present Perfect Continuous Tense) –

1.भूतकाळ केव्हातरी चालू झालेली क्रिया अजूनही चालूच असेल तर तेव्हा चालू पूर्ण वर्तमानकाळ (Present Perfect Continuous) वापरतात.

उदा.

  1. He has been sleeping for five hours (and is still sleeping).
  2. They have been building the bridge for several months.
  3. They have been playing since four o’clock.

2. जी क्रिया आधीच पूर्ण झाली आहे त्यासाठी कधीकधी हा काळ वापरतात. अशा बाबतीत कशाचे तरी समर्थन म्हणून क्रियेच्या चालू स्थितीवर जोर दिलेला असतो.

उदा. ‘Why are your clthes so wet?’ – ‘I have been watering the garden’.

भूतकाळ (PAST TENSES) :

सामान्य भूतकाळ (SIMPLE PAST TENSE) –

1. भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी सामान्य भूतकाळ वापरतात. बहुतांशी भूतकाळवाचक क्रिया विशेषणे किंवा क्रियाविशेषण वाक्यांशी बरोबर सामान्य भूतकाळ येतो.

उदा.

  1. The steamer sailed yesterday.
  2. I received his letter a week ago.
  3. She left school last year.

2. कधीकधी कालवाचक क्रियाविशेषणांशिवाय हा काळ वापरतात. अशा बाबतीत काळ एक तर अध्याहत असतो किंवा संदर्भाने दाखवला जातो.

उदा.

  1. I learnt Hindi in Nagpur.
  2. I didn’t sleep well(i.e., last night).
  3. Babar defeated Rana Sanga at Kanwaha.

भूतकाळात सातत्याने घडणार्‍या क्रियांसाठी सामान्य भूतकाळ वापरतात.

उदा.

  1. He studied many hours every day.
  2. She always carried an umbrella.

चालू भूतकाळ (PAST CONTINUOUS TENSE) –

1. भूतकाळात केव्हातरी सातत्याने चालू असलेल्या क्रियेचा निर्देश करण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. क्रियेची वेळ दर्शविलेली असू शकते किंवा नसूही शकते.

उदा.

  1. We were listening to radio all evening.
  2. It was getting darker.
  3. The light went out while I was reading.
  4. When I saw him, he was playing chess.
  • वरील शेवटच्या दोन उदाहरणांप्रमाणे दीर्घ क्रियेमध्ये एखादी नवीन क्रिया घडली तर चालू भूतकाळ किंवा साधा भूतकाळ वापरतात. नवीन क्रियेसाठी साधा भूतकाळ उपयोगात आणतात.
  • भूतकाळातील न सुटणार्‍या सवयींसाठी always, continually इत्यादी बरोबर या काळाचा वापर करतात.

उदा. He was always grumbling.

 

पूर्ण भूतकाळ (Past Perfect Tense) –

1. भूतकाळातील विविक्षित क्षणाच्या आधी जी क्रिया पूर्ण होते त्याचे वर्णन पूर्ण भूतकाळ करते.

उदा.

  1. I met him in New Delhi in 1996.
  2. I had seen him last five years before.

2. भूतकाळात जर दोन क्रिया घडल्या असतील तर दोहोंमधील कोणती क्रिया आधी घडली व कोणती नंतर हे दाखविण्याची आवश्यकता भासू शकते. अशा प्रकारच्या स्थितीत मुख्यत: पूर्ण भूतकाळाचा उपयोग होतो. एका उपवाक्यात सामान्य भूतकाळ वापरतात आणि दुसर्‍यात पूर्ण भूतकाळ.

उदा.

  1. When I reached the station the train had started (so I couldn’t get into the train).
  2. I had done my exercise when Hari came to see me.
  3. I had written the letter before he arrived.

चालू पूर्ण भूतकाळ (Past Perfect Continuous Tense) –

  • भूतकाळातील एखाधा विशिष्ट वेळाच्या आधी चालू होऊन त्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू असणार्‍या क्रियेसाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरतात.

उदा.

  1. At that time he had been writing a novel for two months.
  2. When Mr. Mukerji came to the school in 1995, Mr. Anand had already been teaching there for five years.
Must Read (नक्की वाचा):

अर्थ व त्याचे प्रकार

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.