विद्युत चुंबक आणि नियम (Electromagnet and it’s Rules)

विद्युत चुंबक :

चुंबकीय बलरेषा :

चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.

चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म :

1. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.

2. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.

3. चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो.

4. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.

उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम :

तुम्ही तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली, जर अंगठा विद्युतधारेची दिशा दाखवत असेल तर वाहकाभोवती लपटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.

फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम :

आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास जर तर्जरी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो.

विद्युतधारा :

विद्युतधारा हा प्रभारांचा प्रवाह असतो. म्हणजेच चुंबकीय क्षेत्राची गतिमान प्रभारांवर बल प्रयुक्त होते. या गुणधर्माचा वापर करून प्रभारीत कणांना अति उच्च ऊर्जा मिळवून देता येते.अशा प्रकारची कणांना दिलेली ऊर्जा वापरुन पदार्थाची रचना अभ्यासता येते.

फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम :

आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट, एकमेकास लंब राहतील अशी धरल्यास, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने आणि अंगठा वाहकाच्या गतीच्या दिशेने असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दाखविते.

Must Read (नक्की वाचा):

गतीविषयक नियम

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.