दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांक

Must Read (नक्की वाचा):

व्यवहारी अपूर्णांक

A) ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 च्या घातांकात असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात.

उदाहरणार्थ :  8/10 = 0.8,  3/100 = 0.03  15/100 = 0.015

 

B) व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना :

1) प्रथम छेद 10 किंवा 10 च्या घातांकात करा.

उदाहरणार्थ : 2/5 = 2×2/5×2 = 4/10 = 0.4, 3/25 = 3×4/25×4 = 12/100 = 0.12

 

2) छेदाच्या 1 वर जेवढे शून्य असतील, तेवढया स्थळानंतर अंशांच्या संख्येत डावीकडे दशांश चिन्ह धा.

उदाहरणार्थ : 5/100 = 0.05, 25/100 = 0.25  125/1000 = 0.125 प्रमाणे

 

C) दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना :

गुणांकातील एकूण स्थळे मोजून तेवढया स्थळानंतर गुणाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहारणार्थ :  15×7 = 105 :: 0.15×0.7 = 0.105 याचप्रमाणे 0.15×0.07 = 0.0105.

 

D) दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना :

1) भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त, भागाकारात तेवढे शून्य उजवीकडे देणे.

उदाहरणार्थ : 36 ÷ 4 = 9, :: 3.6 ÷ 0.04 = 90, 0.36 ÷ 0.0004 = 900

 

2) भाज्याची जेवढी दशांश स्थळे भाजकाच्या दशांश स्थळांपेक्षा जास्त तेवढया स्थळानंतर भागाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहरणार्थ : 75 ÷ 5 = 15  :: 0.75 ÷ 0.5 = 1.5.  0.0075 ÷ 0.05 = 0.15

गुणाकार :

दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना गुणकांची एकूण दशांश स्थळे मोजा व गुणाकारात तेवढ्या स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.

उदा.

  1. 9×8=72
  2. 0.9×0.8=0.72
  3. 0.9×8=7.2
  4. 0.09×0.8= 0.072
  5. 0.09×0.08=0.0072  

नमूना पहिला :

उदा.
5×0.5×0.05 = ?

  1. 2.25
  2. 12.5
  3. 0.125
  4. 0.0125

उत्तर : 0.125

क्लृप्ती –

गुणक संख्यांतील एकूण दशांश स्थळे मोजून येणार्याश गुणाकारात डावीकडे तेवढ्या दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह देणे.

(5×5×5=125  ::5×0.5×0.05=0.125)

नमूना दूसरा :

उदा.
36÷4=9 ; तर 3.6÷0.04=?

  1. 0.9
  2. 9
  3. 90
  4. 0.09

उत्तर : 90

क्लृप्ती –

भाजकाची जेवढी दशांश स्थळे भज्यापेक्षा जास्त; तेवढे भागकारात उजवीकडे शून्य येतात.

3.6 ÷ 0.04 = 90

नमूना तिसरा :

उदा.
72÷9=8; तर 0.072÷0.9=?

  1. 800
  2. 0.8
  3. 0.08
  4. 80

उत्तर : 0.08

क्लृप्ती –

भाज्याची भाजकापेक्षा जेवढी दशांश स्थळे जास्त तेवढ्या जास्त स्थळानंतर डावीकडे भागाकारात दशांश चिन्ह येईल.

0.072÷0.9 भाज्याची 3 स्थळे व भाजकाचे 1 स्थळ आहे, त्यामुळे भाज्याची 2 स्थळे जास्त येतात.

::उत्तरात 2 स्थळानंतर टिंब डावीकडे देणे.

0.072÷0.9=0.08

Must Read (नक्की वाचा):

घन आणि घनमूळ

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.