दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धा 2016 बद्दल माहिती
दक्षिण आशियाई क्रिडा स्पर्धा 2016 बद्दल माहिती
- दिनांक 5 ते 16 फेब्रुवारी 2016
- स्पर्धा – 12 वी
- सहभाग – 8 देश
- खेळाडूचा सहभाग – 2500
- क्रिडा प्रकार – 23 स्पर्धा – 228
- स्थळ – गुवाहाटी (आसाम) समारोप-शिलोंग
- उद्घाटन – इंदिरा गांधी अॅथेलेटिक्स स्टेडीयम
- उद्घाटक – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ही स्पर्धा आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या नियोजनाखाली झाली.
- याआधी या स्पर्धेचे आयोजन 2012 मध्ये दिल्ली येथे होणार होते. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने 2012 व 2014 या काळासाठी निलंबित केल्याने स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (2015) मध्ये बंदी मागे घेतल्याने ह्या स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले होते.
- भारतात या आधी 1987 (कोलकत्ता) 1995 (चेन्नई) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
- यापूर्वी ह्या स्पर्धा 2010 मध्ये ढाका येथे घेण्यात आल्या होत्या. त्यात भारताने 175 पदके जिंकली होती त्यात 90 सुवर्ण पदके जिंकली होती.
- भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या 8 देशांचा या स्पर्धेत सहभाग आहे.
- या स्पर्धेचे घोषवाक्य – शांती, प्रगती आणि समृद्धि