Current Affairs (चालू घडामोडी) of 25 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. उपग्रहाचा वापर करून दिला जाणार पीक विमा 
2. अयोध्येत बनणार राम मंदिर व मस्जिद
3. महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
4. राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी
5. कुंबळे यांचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश
6. दिनविशेष

 

 

 

उपग्रहाचा वापर करून दिला जाणार पीक विमा :

  • उपग्रहाचा वापर करून पीकविमा देण्याची तयारी सरकारची सुरू आहे.
  • आता देशातील सर्व शेतजमिनी डिजिटल नकाशावर दिसणार असून या सर्व डाटाचा वापर पीकविमा निश्चित करण्यासाठी केले जाणार आहे.
  • देशातील शेतजमीनिचा आकार लहान असल्यामुळे उपग्रहाच्या आधारे अंदाज काढणे उपयुक्त ठरणार आहे.
  • उपग्रहाच्या आधारे शेतीचा उत्पादन निर्देशांक ठरविला जाईल.

अयोध्येत बनणार राम मंदिर व मस्जिद :

  • अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवरुन सुरू असलेल्या वादावर तोडगा म्हणून त्या 70 एकरच्या या जागेवर राम मंदिर व मस्जिद दोन्ही बांधले जाईल आणि दोघांच्या मधोमध 100 फूट उंच भिंत बांधून या जागेचे विभाजन करण्यावर दोन्ही पक्षकारांचे एकमत झाले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडू असे महंत ज्ञान दास यांनी संगितले.

महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण :

  • महात्मा गांधी यांच्या ब्रॉझच्या पुतळ्याचे येथील ब्रिटनच्या एतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये 14 मार्च रोजी अनावरण होणार आहे.
  • पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ही घोषणा केली.
  • या कामासाठी ख्यातनाम पोलाद उत्पादक लक्ष्मी एन.मित्तल एक लाख पौंड दिले आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी :

  • राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चपासून सुरू होत असून राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे.
  • अभय सभागृहाच्या 1 एप्रिलपर्यंतच्या कामकाजाला मंगळवारी मंजूरी देण्यात आली.

कुंबळे यांचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश :

  • भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेचा रविवारी औपचारिकरित्या आंतरराष्ट्रीयक्रिकेट परिषदेच्या मानाचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आला.
  • क्रिकेट जगातील यादीत सामील होणार कुंबळे हा चौथा भारतीय तर 77वा खेळाडू आहे.
  • जेष्ठ महिला क्रिकेटपटु बेटी विल्सन यांचाही या यादीत समावेश करण्यात आला.

दिनविशेष :

  • 1510 गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.
  • 1840 – मराठीतील बाल बड्मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.