Current Affairs (चालू घडामोडी) of 21 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. अखेर मोदींच्या सुटची विक्री
2. मृदा स्वास्थ्य योजना 
3. गोविंद पानसरे यांचे निधन
4. तपन मिश्रा यांची ‘सॅक’च्या प्रमुखपदी नियुक्ती
5. दिनविशेष

 
 
 

अखेर मोदींच्या सुटची विक्री :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटची आज विक्री झाली असून 4 कोटी 31 लाख रुपयांना तो विकण्यात आला.
  • धर्मा नंदन समूहाचे मालक हितेन भाई पटेल यांनी हा सूट विकत घेतला आहे.

मृदा स्वास्थ्य योजना :

  • शेतकर्‍यांसाठी सरकारने मृदा स्वास्थ्य योजना आणली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकर्‍यांसाठी ‘मृदा स्वास्थ्य कार्ड‘ योजनेचे उद्घाटन केले.
  • या योजनेत शेतजमिनीचे आरोग्य सांभाळले जाणार असून खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.
  • तीन वर्षात सुमारे 14 कोटी शेतकर्‍यांना या कार्डचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • या कार्डचा वापर जमिनीची तपासणी करण्यासाठी होईल.

गोविंद पानसरे यांचे निधन :

  • कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मुंबईतील ब्रिचकॅँडी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले.
  • पानसरे हे 81 वर्षांचे होते.
  • 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.20 वाजता पानसरे यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलमधून पाच गोळ्या घातल्या.

तपन मिश्रा यांची ‘सॅक’च्या प्रमुखपदी नियुक्ती :

  • प्रख्यात शास्त्रज्ञ तपन मिश्रा यांची अंतराळ संशोधन संस्थेच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली.
  • मिश्रा हे इस्त्रोच्या बंगळूर मुख्यालयातील ‘इनोव्हेशन्स मॅनेजमेंट‘ कार्यालयात प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

दिनविशेष :

  • 21 फेब्रुवारी 2015 मातृभाषा दिवस.
  • 1894 – प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म.



You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.