Current Affairs of 10 June 2015 For MPSC Exams

“गुगल” नंतर आता चीनचीही स्वयंचलित कार
- गुगलच्या बहुचर्चित चालकरहित स्वयंचलित मोटारीशी स्पर्धा करण्यासाठी आता चीनमधील “बैदू” ही कंपनी अशाप्रकारची मोटार विकसित करत आहे.
- “बैदू” ही चीनमधील वेब सेवा देणारी कंपनी आहे आणि एका ऑटोमोबाईल कंपनीच्या साहाय्याने “बैदू” स्वयंचलित मोटार तयार करत आहे. “बैदू” ने यापूर्वी बीएमडब्ल्यूच्या सहकार्याने सेमी ऍटोनोमस तंत्रज्ञान असलेली मोटार विकसित केली होती.
- या नवीन स्वयंचलित मोटारीमध्ये बैदू नकाशा, बैदू डेटा, बैदू ब्रेन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ताही असल्याचे म्हटले आहे. यात विशेष आकर्षण म्हणजे “बैदू ब्रेन” असेल, जे की मानवी मेंदुच्या पद्धतीप्रमाणे कार्य करेल.
“योग दिवस” साजरी होणार 192 देशांत
- जगातील 193 पैकी 192 देशांत व या देशांमधील सुमारे 250 शहरांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय, तसेच भारतातील 676 पैकी 650 जिल्ह्यांमध्ये 21 जून रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात येणार आहे.
- दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजपथावर 35 हजार लोकांच्या सहभागाने तो साजरा केला जाणार आहे.
- एवढ्या प्रचंड व सरकारच्या दाव्याप्रमाणे वैश्विक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाचा समावेश “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्” मध्ये समावेश करण्यासाठी सरकारने अर्ज केला आहे.
- या दिवसानिमित्त 100 रुपये आणि 10 रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे आणि त्याचप्रमाणे सरकारतर्फे टपाल तिकिटही प्रकाशित केले जाणार आहे.
इस्रोला मिळाला राष्ट्रीय अवकाश संस्थेचा पुरस्कार
- भारताच्या अत्यल्प खर्चात यशस्वीपणे पार पडलेल्या मंगळमोहिम प्रकल्पास अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेचा (एनएसएस) 2015 च्या “स्पेस पायोनिअर” पुरस्कार मिळाला आहे.
- कॅनडातील टोरांटोमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेच्या 34 व्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार इस्रोला प्रदान करण्यात आला आहे.
- रशिया, अमेरिका, युरोप या देशांना मागे टाकत इस्रोने मागील वर्षी पहिल्याच प्रयत्नात अत्यल्प खर्चात मंगळयान मोहिम यशस्वी करून दाखविली होती.
लष्कराच्या वेतनासाठी केला “पीएनबी” सोबत करार
- भारतीय लष्कर आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्यात लष्करी वेतन खाते उघडण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे त्यामुळे लष्करी खात्यातील लोकांना वैयक्तिक अपघातानंतरदेखील विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
- जवान, निवृत्तिवेतनधारक व त्यांच्या कुटूबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
- या कराराचे वैशिष्ठ्ये म्हणजे वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची रक्कम दोन लाख आणि पाच लाख करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 50,000 आणि दोन लाख होती. तसेच लष्करी ऑपरेशनच्या वेळी जवानांना मृत्यू आल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
“युनितार” च्या प्रमुखपदी निखिल सेठ यांची निवड
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (युनितार) प्रमुखपदावर निखिल सेठ या वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांची या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदावर नियुक्ती केली आहे.
- “युनितार” या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास आणि संशोधन कार्यक्रमांद्वारे जवळपास 25 हजार जणांना लाभ होत असतो.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती
- पुण्यातील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज जाहीर केले आहे.
- आगामी तीन वर्षांसाठी या संस्थेच्या 27 जणांच्या कार्यकारिणीचीही फेररचना करण्यात आली असून, यामध्ये विख्यात निर्माता-दिग्दर्शक राजू हिरानी व अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी, अनघा घैसास आदी मराठी नावांचाही समावेश करण्यात आला आहे.
दिनविशेष:
- 1890 – भारतामध्ये “रविवार” च्या साप्ताहिक सुट्टीला सुरुवात. मुंबईतील गिरणी कामगार संघटनेने साप्ताहिक सुट्टीची मागणी केली होती.
- 1966 – मिग जातीच्या विमानाची नाशिक येथे निर्मिती.
- 1991 – बांगलादेशात संसदीय लोकशाहीची स्थापना.