Current Affairs (चालू घडामोडी) of 1 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. 1 डिसेंबर WORLD AIDS दिवस म्हणून साजरा
2. नो-इबोला प्रमाणपत्र आवश्यक
3. बीएमडब्ल्यु नवी दिल्लीत सादर
4. दहा रूपयाच्या आता प्लॅस्टिकच्या नोटा
5. चेंडू लागून पुन्हा एक बळी

 

 

1 डिसेंबर WORLD AIDS दिवस म्हणून साजरा :

  • या मोहिमेत समुपदेशनाबरोबर चाचणी, उपचार, जागृती, आणि जीवनशैली निगडीत सुविधा देण्यावर भर देणे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
  • समाजातील विविध स्तर आणि घटकांमध्ये विशेष मोहीम राबवली जाते, कारण सान 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्य एडसमुक्त करण्याचे ध्येय आहे.
  • राज्यभारत एचआयव्ही बधितांना बीपीएल कार्ड देणे, त्यांच्यासाठी समुपदेशन आणि संमेलण घेणे, तसेच संजय गांधी निराधार योजनेशी त्यांना जोडणे.
  • महाराष्ट्र राज्य एडसमुक्त करण्यासाठी राज्यभरात “विहान प्रकल्प” राबवण्यात येणार आहे.

 

नो-इबोला प्रमाणपत्र आवश्यक :

  • ईबोलाच्या विषाणूंचा देशातील प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ही उपाययोजना आखली आहे.
  • ईबोलाग्रस्त देशांतून भारतात येणार्‍या प्रवाशांना आता “नो-इबोला प्रमाणपत्र” बाळगणे आवश्यक आहे.
  • ईबोलाचा उपचार झालेले पण ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांनी नव्वद दिवस प्रवास करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे.

 

बीएमडब्ल्यु नवी दिल्लीत सादर :
  • कंपनीचा राजदूत (Brand Ambassador)क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित होता.
  • पूर्णत: भारतीय बनावटीची पहिली आलिशान सेदान श्रेणीतील कार मूळच्या जर्मनीच्या बीएमडब्ल्यु नवी दिल्लीत सादर केली.

 

दहा रूपयाच्या आता प्लॅस्टिकच्या नोटा :

  • आता दहा रुपये मुल्याच्या एक अब्ज प्लॅस्टिक नोटा देशातील पाच शहरामध्ये चलनात येणार आहे.
  • कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला, आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत.
  • हा प्रयोग अशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे. मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांचा वापरही पूर्वीप्रमाणे सुरू राहील.
  • बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 

चेंडू लागून पुन्हा एक बळी :

  • इस्त्रायलच्या अशदोद शहरातील एका सामन्यात पंचाचे काम करणार्‍या 55 वर्षीय हिलेल ऑस्कर यांचा चेंडू लागून मृत्यू झाला आहे.

 

दिनविशेष :
 
  • 1 डिसेंबर – जागतिक AIDS दिवस.
  • 1963 नागालँड भारताचे 16वे घटकराज्य बनले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.