कंपनीच्या राज्यसत्तेच्या काळात गाजलेले भारताचे गव्हर्नर जनरल

कंपनीच्या राज्यसत्तेच्या काळात गाजलेले भारताचे गव्हर्नर जनरल

लॉर्ड विल्यम बेंटीक (सन 1833 ते 1835)

  • तिसर्‍या चार्टर अॅक्टनुसार (1833) बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरलचा दर्जा देण्यात आला.
  • लॉर्ड बेंटीक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होय.

 

चार्लस मेटॅकाफ (सन 1835 ते 1836)

  • चार्लस मेटॅकाफने सन 1835 मध्ये भारतीय मुद्रण स्वातंत्र्याचा कायदा पास केला. यामुळे त्यास मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता असे म्हणतात.

 

लॉर्ड हार्डिंग (सन 1844 ते 48)

  • लॉर्ड हार्डिंगच्या काळापासून शासकीय कार्यालयास रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्यात आली.

 

लॉर्ड डलहौसी (सन 1848 ते 56)

  • लॉर्ड डलहौसीने केवळ आठ वर्षाच्या काळात अनेक महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. यामुळे त्याला भारतातील आधुनिक सुधारणेचा जनक असे म्हणतात.

लॉर्ड डलहौसीच्या काळात खालील घटना घडल्या :

  • लॉर्ड डलहौसीने निपुत्रिक राजाचा दत्तक घेण्याचा अधिकार नामंजूर करून सातारा(1848), संबळपूर(1849), नागपूर(1853), झाशी(1853), इत्यादि संस्थाने खासला करून कंपनीच्या साम्राज्याला सामील केली.
  • भारतातील पहिला रेल्वेमार्ग सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या दोन स्थानका दरम्यान सुरू झाला.
  • सन 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने भारतीय टपाल व तार खात्याची स्थापना केली.
  • सन 1853 मध्ये सर चार्लस वुड समितीच्या शिफारसीनुसार सन 1858 मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या काळात मुंबई, मद्रास(चेन्नई) व कलकत्ता (कोलकाता) येथे विध्यापीठे स्थापन करण्यात आली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.