बँकांचे संचालक अपात्र
बँकांचे संचालक अपात्र
- अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे सहकारी बँका अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकास बँकेचे संचालकपद धोरण करण्यासाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला (18 एप्रिल 2016)
- त्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 (क) (अ) पोटकलम (3 स) समाविष्ट करण्यात आले आहे.
- यानुसार सहकारी बँकेच्या संचालकास त्या बँकेवर संचालक मंडळाच्या दोन वर्ष कालावधीसाथी संचालक पद धारण करण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. बँक बरखास्त झाल्याच्या दिनांकापासून संचालक मंडळाच्या पुढील दोन वर्ष कालावधीसाठी संबंधित दोषी संचलकास अपात्र ठरविण्यात येणार आहे.
- कलम 110 (अ) नुसार सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आर.बी.आय. संचालक मंडळास त्याच्या अधिपत्याखाली बँकिंग व्यवहार सुधारण्यासाठी संधी देते. त्यानंतर सुधारणा न झाल्यास बँकिंग नियमन अधिनियम 1949 चे कलम 35 नुसार निर्बंध घालून सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात येतात. या सुधारणा झाल्या नसल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्यास प्रस्ताव सहकारी आयुक्त कार्यालयास दिला जातो.