अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 4 बद्दल माहिती
अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 4 बद्दल माहिती
- विमा, निवृत्तीवेतन, स्टॉक एक्सचेंज, मालमत्ता पुनर्बाधणी कंपन्यांना एफडिआय नियमावलीत सवलत देणार.
- पीएसयू बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी 25 हजार कोटी.
- निरगुंतवणूक विभागाचे नाव बदलून गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग करणार.
- पीपीपीला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न.
- पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नवी क्रेडिट रेटिंग प्रणाली.
- स्वायत्त संस्थांचे सिंहावलोकन आणि सुसूत्रीकरण करणार.
- एटीएम तसेच पोस्टातील मायक्रो एटीएमची संख्या वाढविणार.
- भारतात राहणार्या व्यक्तीला नोंदणीकृत पेटंटपासून जगभरातून मिळणार्या उत्पन्नावर दहा टक्के कर.
- रेफ्रिजरेटरवरील सीमा व अबकारी शुल्क 6 टक्क्यांहून घटवून 5 टक्के केले.
- आण्विक क्षेत्रासाठी 3 हजार कोटी
- ईशान्य भारताच्या विकासासाठी 33,097 कोटींची तरतूद.
- मॉडल शॉप्स व एस्टॅब्लिशमेंट विधेयक जारी करणार सरकार.
- समुद्रातून वायुनिर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन.
- एनएचएआय, आयआरईडीए. नाबार्डसारख्या संस्थांना 35,300 कोटींचे इन्फ्रा बॉण्ड देणार.