अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 3 बद्दल माहिती
अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 3 बद्दल माहिती
- घरभाडे भत्यावरील कर सवलतीची मर्यादा 20 हजारांहून वाढवून 60 हजार केली.
- नव्या बांधकामांसाठी कॉर्पोरेट कराचा दर 25% करण्यात आला.
- बिडीशिवाय इतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील अबकारी कर 10 ते 15 टक्क्यांनी वाढविणार.
- सरकारी बाबूंच्या प्रशिक्षणासाठी 220 कोटी.
- कौशल्य प्रशिक्षण योजनेतून उपलब्ध करण्यात आलेल्या सेवांना कर सवलत.
- काळा पैसा बाळगणार्यांना कर कायदा अनुपालनासाठी चार महिन्यांचा कालावधी, 45 टक्के कर व व्याज लावणार.
- जुन्या कर प्रकरणांत एकरकमी वाद निवारण योजना, दंड-व्याज लागणार नाही.
- कोळसा, लिग्नाईट व पीटवर स्वच्छ ऊर्जा उपकर 200 रुपये प्रतिटनावरून 400 रुपये प्रतिटन करण्यात आला.
- 2017-18 पर्यंत वित्तीय तूट सकल घरेलू उत्पन्नाच्या 3 टक्के ठेवण्याचे लक्ष्य, 3.9 टक्के होते. 2016-17 मध्ये ते 3.5 टक्के असेल.
- 2015-16 मध्ये चालू खात्याची तूट 14.4 अब्ज डॉलर, जीडिपीच्या तुलनेत हे प्रमाण 1.4 टक्के.
- संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद 10 टक्के वाढ, 2 लाख 58 हजार कोटी करणार खर्च.
- परदेशी चलनाची गंगाजळी 350 अब्ज डॉलर्सवर.