अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 1 बद्दल माहिती
अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 1 बद्दल माहिती
- 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आयकर दात्यांना दिलासा, कलम 87 (1) नुसार आयकर सूट मर्यादा 2 हजारहून 5 हजारपर्यंत वाढविली.
- पायाभूत सुविधांवर 2.21 लाख कोटींचा खर्च
- शेतकर्यांच्या कल्याणासाठी 35,984 कोटींची तरतूद, पाच वर्षात सिंचनावर 86, 500 कोटी खर्च करणार.
- कृषि कर्जाचे लक्ष्य वाढवून 9 लाख कोटी.
- नाबार्ड अंतर्गत 20 हजार कोटींचा सिंचन कोष बनविणार.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकीकृत बाजार पोर्टलचे अनावरण.
- खतांचे अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यात, प्रयोगिक तत्वांवर निवडक जिल्ह्यांत प्रकल्प.
- मनरेगासाठी 38,500 कोटींची तरतूद.
- 1 मे 2018 पर्यंत 100 टक्के ग्रामीण भागाचे विद्युतीकरण.
- ‘आधार’ योजनेला घटनात्मक दर्जा.
- स्वच्छ भारत मोहिमेसाठी 9 हजार कोटींची तरतूद
- मागासवर्गीय व महिलांसाठी स्टँड अप इंडियासाठी 500 कोटींची तरतूद.
- खाद्यन्न उत्पादनांत 100 टक्के परदेशी गुंतवणूक.
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी 1.80 लाख कोटींचा निधी.
- 1 जून 2016 पासून सर्व करपात्र सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण सेस.