आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

 • रेल्वे यंत्रणा आयआरसीटीसी आणि पवन हंस हेलिकॉप्टर कंपनी यांच्यात करार होऊन (17 मार्च 2016) हेलिकॉप्टर पर्यटनाला चालना देण्यासाठी आयआरसी-टीसीच्या वेबसाईटवर पवन हंसाच्या हेलिकॉप्टर सेवेची तिकिटे उपलब्ध करण्यात येणार आहे.
 • एअरटेल कंपनीने (व्हिडिओकॉलनचे 1800 मेगाहर्ट ब्रॅंडचे स्पेक्ट्रम 4428 कोटी रुपयांत खरेदी केले (करार 17 मार्च 2016).
 • शेतकी साधने शेतकर्‍यांना भाडेतत्वावर देण्याची सेवा भारतात सुरू करणारी पहिली कंपनी महिंद्र फॉर्म कंपनी ही होय.
 • ‘असोचेम’ या औद्योगिक संघटनेच्या आघाडीवर असणारी भारतातील आघाडीची राज्य – प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र (72.83 अब्ज डॉलरची निर्यात, गुजरात (59.58 अब्ज डॉलर), तामिळनाडू (24.47 अब्ज डॉलर)

 

बँक बोर्ड ब्युरो बैठक

 • दिनांक 8 एप्रिल 2016
 • स्थळ – मुंबई
 • अध्यक्ष – विनोद रॉय
 • चर्चा –
 • बँकांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करणे, बँकांच्या निधीमध्ये वाढ करणे, त्यांना अधिक प्रतिस्पर्धी बनवण्यावर उपाय करणे.

 

जागतिक बँक अंदाज

 

 • 2016 मध्ये भारताचा विकास दर 7.5 % तर 2017 मध्ये 7.7% राहील. दक्षिण आशियाचा वृद्धी दर 2016 मध्ये 7.1% तर 2017 मध्ये 7.3% टक्क्यापर्यंत राहील.
 • श्रीलंका 2016 आणि 2017 मध्ये 5.3 टक्के चीन 2016 मध्ये 6.7 टक्के, 2017 मध्ये 6.5 टक्क्यापर्यंत राहील.
 • पाकिस्तान 2016 मध्ये 4.5 टक्के, 2017 4.8 टक्के
 • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस सेवेचे उद्घाटन 11 एप्रिल 2016 रोजी करण्यात आले. या सेवेमुळे एका मेसजच्या माध्यमातून कोणत्याही बँकेत रक्कम हस्तांतरित करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
 • गेल्या आर्थिक वर्षात देशातील परकीय गुंतवणुकीत 37 टक्क्यांची वाढ झाली. 39 अब्ज 32 कोटी अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक भारतात आली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.