आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4

आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4

  • इंग्रजी सक्तीचे करणारा देश ब्रिटन हा आहे.
     
  • मागील तीन वर्षापासून ‘यू-ट्यूब’ या संकेतस्थळावर असलेली बंदी पाकिस्तान सरकारने 18 जानेवारी 2016 रोजी उठविली.  
  • 19 जाने. 2016 रोजी फ्रान्समध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्यात आली.
     
  • दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका मोहिमेसाठी 20 जानेवारी 2016 रोजी गेलेल्या चीनी वैज्ञानिकांना अमेरिकेतील ग्रेट कॅनयन पेक्षाही मोठी दरी (घळ) सापडली, ती 1000 कि.मी. लांब, 1500 मीटर खोल व 26.5 किलोमीटर रुंद आहे.
  • वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाह बाचा खान विद्यापीठात 20 जानेवारी 2016 रोजी अतिरेकी हल्ला झाला.
  • अमेरिकेत 24 जाने. 2016 रोजी स्नोजीला हे वादळ आले होते.
  • हिंदु विवाह विधेयक 2015 याला पाकिस्तानच्या संसदीय समितीने 1 फेब्रुवारी 2016 रोजी  मंजूरी दिली.
  • 4 फेब्रुवारी 2016 रोजी फेसबुकला 12 वर्ष पूर्ण झाली. फेसबुकची स्थापना 4 फेब्रु. 2004 रोजी करण्यात आली.
  • 27 वर्षांनंतर परत भारत आणि नेपाळ या दोन देशात मैत्र बस सेवा 4 जाने. 2016 ला सुरू झाली.
  • अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले लढाऊ विमान एफ-16 हे आहे.
  • एफ-16 ची वैशिष्ट्ये – कोणत्या हवामानामध्ये वेगाने उडणारे ‘एफ-16’ हे जगातील सर्वात धोकादायक विमान, रात्रीच्या वेळीही कारवाई करणारे विमान, 1500 मैल प्रतितास वेगाने उडण्याची या विमानाची क्षमता, जगात 28 देशाकडे हे विमाने आहेत.
  • शेक्सपिअरच्या मृत्युला 2016 या वर्षी 400 वर्षे पूर्ण झाले.
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपबील्कन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढवत आहे.
  • 19 फेब्रुवारी 2016 रोजी अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंध लादले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.