आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 3
आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 3
- जगभरात 71.7 कोटी टन गहू उत्पादन होणार – एफ.ए.ओ. (फुड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन).
- युरोप, रशिया, युक्रेन प्रमुख उत्पादक देश असणार.
- बुध हा ग्रह सूर्याच्या पृष्ठभागवरून सरकत गेला. (9 मे 2016) तेव्हा सुर्यावर काळा ठिपका दिसल्या गेला या घटनेस बुधाचे पारगमन किंवा अधिक्रमण म्हणतात. ही घटना 10 वर्षांनंतर दिसून आली. या घटनेत सूर्य आणि पृथ्वीमधून बुध सरकत जातो त्यावेळी तिघेही एकाच रेषेत येतात. बुधाचे पहिले पारगमन 7 नोव्हें. 1631 मध्ये बघितले गेले. त्यानंतर अलिकडे 15 नोव्हें. 1999. 7 मे 2013, आणि 8 नोव्हें. 2006 मध्ये बुध पारगमन घडले आहे.
- गांधील माशीच्या नवी प्रजाती कोनो ब्रेगमा यास हॉलीवुड अभिनेता ब्रॅड पीट्स असे नाव देण्यात आले (कोनोब्रेगामा ब्रॅडविटो)
- इंग्लंडची ऑनलाइन बाजार सांधोधन कंपनी (युगोव्ह) सर्वेक्षणानुसार जगातील प्रशंसनीय यादीत बिल गेट्स प्रथम क्रमांकावर ओबामा दुसर्या क्रमांकावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तिसर्या, नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर, महिलांच्या यादीत जर्मनीच्या चॅन्सलर अॅजलिना जेली प्रथम, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसर्या क्रमांकावर, हिलरी क्विंटल तिसर्या क्रमांकावर आहेत.
- फिलिपाईन्सच्या राष्ट्रपतीपदी मावेरिक रोड्रिगो यांची निवड (10 मे 2016)
- जगातील सर्वात मोठे – अॅन्टोनोव्ह सन-225 मिया हे विमान युक्रेनने तयार केले आहे. 117 टन वजन, लांबी 84 मीटर, पंख्यांची लांबी 88 मीटर, 42 चाके आहेत. 6 इंजिन आहेत.
- भारत, तुर्कमिनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्या 1680 कि.मी. लांबीची गॅस पाइपलाईन यांच्यात मोटर व्हेईकल करार झाला आहे.
- 1971 च्या पाकिस्तान विरोधी बांग्लादेश मुक्ति-लढ्यातील युद्ध गुन्हेगार, जामात-ए-इस्लामी संघटनेचा नेता मोती-उर-रहेमान यास 10 मे 2016 रोजी फाशी देण्यात आली. त्याच्यावर हत्या, बलात्कार, बुद्धीजीवींना क्रूरपणे मारणे हे आरोप होते. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने 29 अॅक्टो. 2014 रोजी फाशी सुनावली होती. बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने त्यास 6 मे 2016 रोजी फाशी सुनावली होती.
- अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागर आणि त्यावरील तापमानाचा फरक स्थिरांकामध्ये मोजला जातो. या दोन्ही दरम्यान तापमानाचा फरक 0.5 पेक्षा अधिक असल्यास त्याला अल-निनो म्हणतात. या दोन्ही तापमानाचा फरक उणे 0.5 पेक्षा कमी झाल्यास या परिस्थितीला ला-निनो असे म्हणतात.
- फोर्ब्स नियतकालिकाच्या सर्वेक्षणानुसार (2016) जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड अॅपल कंपनीचा होय. या यादीत अमेरिका-52, जर्मनी-11, जपान-8, फ्रान्स-6, स्वित्झर्लंड-4 ब्रँडचा समावेश आहे. या यादीत पहिल्या शंभरात एकही भारतीय ब्रँड नाही. 2 अॅपल कंपनीचे मूल्य 15400 कोटी डॉलर आहे. त्यानंतर गुगुल ब्रँड मूल्य 8250 कोटी डॉलर आहे. मायक्रोसॉफ्ट 7520 कोटी डॉलर मूल्य आहे.
- अवकाशात उमललेले पहिले फूल ‘झिनिया’ हे होय.
- जागतिक पहिले झोपडपट्टी संग्रहालय मुंबई येथे नियोजित आहे.