आनंदी देशामध्ये भारताचा 118वा क्रमांक त्याबद्दल माहिती
आनंदी देशामध्ये भारताचा 118वा क्रमांक त्याबद्दल माहिती
- संयुक्त राष्ट्राच्या ‘शाश्वत विकास उपाय नेटवर्क’ संस्थेने 17 मार्च 2016 रोजी ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट – 2016’ जारी केलेल्या 156 देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत 118 व्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये भारत 117 व्या क्रमांकावर होता.
- या अहवालात प्रतिव्यक्ति सकल राष्ट्रीय उत्पन्न अपेक्षित आर्युंमान, सामाजिक आधार आणि आयुष्य जगण्याच्या स्वातंत्र्याला आनंदाचे मापदंड म्हणून निश्चित करण्यात आले होते.
- या यादीत 156 देशांचा अभ्यास करण्यात आले.
- सर्वाधिक आनंदी देश : डेन्मार्क (प्रथम क्रमांक), स्वित्झर्लंड (2), आइसलँड (3), नोर्वे (4), फिनलँड (5) क्रमांकावर आहेत.
- तळाचे देश : रवांडा (152), बेनिन (153) अफगाणिस्तान (154), टोगो (155), सिरिया (156)
- इतर देश : चीन (83), पाकिस्तान (92), सोमालिया (76), इराण (105), पॅलेस्टाईन क्षेत्र (108), बांग्लादेश (110)
- अमेरिका (13), ऑस्ट्रेलिया (9), इस्त्रायल (11) क्रमांकावर आहेत.
- संस्थेचा चौथा अहवाल आहे. 2012 मध्ये प्रथम अहवाल तयार केला.
- या आनंदी देशाच्या अहवालात आतापर्यंत तीन वेळेस डेन्मार्क व स्वित्झर्लंड एक वेळेस प्रथम स्थानावर होते.
- 2013 मध्ये भारत या क्रमवारीत 111 व्या क्रमांकावर होता.
- 20 मार्च – जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जातो.