आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती

आधुनिक भारत (1885-1905) बद्दल माहिती

 • माजी सनदी अधिकारी अॅलन ओक्टिव्हि हयूम यांनी तत्कालीन व्हाईसरॉय डफरीन यांच्या सहकार्याने 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची (काँग्रेसची) स्थापना केली.
 • मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात पहिले अधिवेशन भरले. देशाच्या विविध भागातून या अधिवेशनास 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले.
 • डिसेंबर 1885 साली पुण्यात कॉलर्‍याची साथ आल्यामुळे नियोजित पुणे अधिवेशन मुंबईला भरले.
 • राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी
 • राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये न्या. महादेव गोविंद रानडे, पितामह दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, बेहरामजी मलबारी, रहिमतुल्ला सयानी, सर नारायण चंदावरकर, इ. महाराष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला होता.
 • 1888 साली ‘ब्रिटिश समितीची’ स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने ‘इंडिया’ नावाचे मासिक चालवून हिंदी लोकांच्या परिस्थितीचे सत्य वर्णन केले गेले.
 • 1882 मध्ये दादाभाई ब्रिटिश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या सभागृहासाठी निवडून आले.
 • 1895 मध्ये हिंदूस्थानातील खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशनची नेमणूक करण्यात आली.
 • 1897 मध्ये पुण्यात चाफेकर बंधुनी प्लेग अधिकारी रॅड व आयर्स्ट यांची हत्या केली.
 • 1899 मध्ये साम्राज्यवादी वृत्तीच्या लॉर्ड कर्झन याची ‘भारताचा व्हॉईसरॉय’ म्हणून नेमणूक झाली.
 • कर्झनने 1901 मध्ये ‘पंजाब लँड डेव्हलपमेंट कायदा’ पास करून कर्जबाजारी शेतकर्‍यांची कर्जे माफ केली.
 • 1904 मध्ये ‘सहकारी पतपेढी कायदा’ करून शेतकर्‍यांना कर्जे मिळवण्याची सोय केली.
 • कृषी मार्गदर्शनासाठी 1901 मध्ये कर्झनने ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ अॅग्रीकल्चर’ नेमले.
 • 1899 मध्ये पुसा येथे कर्झनने कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.
 • 1903 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली.
 • पोलीस व गुन्हेगरांचे संबंध तपासण्यासाठी कर्झनने अँड्रु फ्रेझर समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार कर्झनने संपूर्ण पोलीस खात्याचे पुनर्जीवन केले.
 • 1901 मध्ये ‘Imperial cadet core’ ची स्थापना कर्झनने केली – (संस्थानिकांच्या राजपुत्रांकरिता)
 • कोलकत्ता येथे व्हिक्टोरिया राणीच्या स्मृती प्रित्यर्थ ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ कर्झनने बांधला.
 • 1900 मध्ये कोलकत्ता नगरपालिका कायदा करण्यात आला.
 • 1904 मध्ये कर्झनने पुराणवस्तू संरक्षण खाते निर्माण करून भारताच्या संस्कृतीची जपवणूक केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.