डॉ. अभय अष्टेकर यांना आइनस्टाइन पुरस्कार जाहीर

डॉ. अभय अष्टेकर यांना आइनस्टाइन पुरस्कार जाहीर

 • भारतीय वंशाचे अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ प्रा. आभा अष्टेकर यांना सन 2019 चा अमेरिकन फिजिकल सोसायटीचा प्रतिष्ठेचा ‘आइनस्टाइन पुरस्कारजाहीर झाला.
 • गुरुत्वाकर्षणशास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार 2003 पासून दिला जातो.

dr abhay ashtekar yaanna aainstain puraskar

डॉ. अभय अष्टेकर यांच्याविषयी माहिती

 • जन्म: 5 जुलै 1949.
 • मुंबई, पुणे आण कोल्हापूर येथून उच्चशिक्षण.
 • मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेतून बीएससी पदवी.
 • सन 1974 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी.
 • सध्या पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमॉस या संस्थेचे संचालक.

कार्य

 • सापेक्षतावाद, कृष्णविवर, गुरुत्वाकर्षण, पुंजीय अवकाश-विज्ञान या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान.
 • लूप क्वांटम ग्रॅव्हिटी व लूप क्वांटम कॉस्मेलॉजी या सिद्धांटाचे जनक म्हणून ओळख.
 • या सिद्धांतात वापरल्या गेलेल्या चल राशींना ‘Ashtekar Variables‘ या नावाने ओळख.
 • ऑक्सफर्ड, पॅरिस आणि सिराक्यूस, न्यूयॉर्क येथे भौतिकशास्त्रज्ञ, तसेच प्राध्यापक म्हणून काम.
  270 संशोधनपत्राचे व 9 पुस्तकांचे लेखन.

सन्मान

 • जर्मनी आणि फ्रान्समधील विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट.
 • अमेरिकन फेडरेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स‘ आणि ‘अमेरिकन फिजिकल सोसायटी‘चे फेलो.
 • भारतीय अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या आंतरराष्ट्रीय समुदायातून निवडलेल्या 51 सन्माननीय फेलोंपैकी एक.
 • अलेक्झांडर वॉन हंबोल्ड फाउंडेशनचा ज्येष्ठ संशोधक पुरस्कार.
 • 2008 मध्ये जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लंकच्या 150व्या जयंतीनिमित्त तयार केलेल्या ‘कॉसमॉस‘ या जर्मन डॉक्युमेंटरीमध्ये अष्टेकरांना स्थान.
आइनस्टाइन पुरस्कारविषयी माहिती –
1. गुरुत्वाकर्षणशास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
2. सुरुवात: 2003.
3. स्वरूप: 10000 डॉलर रोख रक्कम.
4. पहिला आइनस्टाइन पुरस्कार पीटर बर्गमन आणि जॉन व्हीलर यांना देण्यात आला. त्यांनी संशोधकांचे लहान लहान गट तयार करून अमेरिकी विद्यापीठांना सामान्य सापेक्षता सिद्धांताची ओळख करून दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.