आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 1 बद्दल माहिती

  • एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या संचालकपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक स्वाती दांडेकर यांची नियुक्ती (18 मे 2016) रॉबर्ट एम.सोर यांची जागा घेतली.
  • ब्रिटनमधील ब्रुनेल विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच भारतीय व्यक्ति रणजितसिंह यांची नियुक्ती करण्यात आली. (13 मार्च 2016)
  • म्यानमार अध्यक्षपदी तिन क्याव यांची निवड (15 मार्च 2016) म्यानमार मध्ये राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्तीची पहिल्यांदाच लोकशाही मार्गाने निवड झाली. 1962 नंतर देशात लोकशाहीवादी अध्यक्ष निवडून आले. नोव्हें. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत म्यानमारच्या नेत्या स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला बहुमत मिळाले होते. म्यानमार मध्ये लष्करी राजवट होती.
  • म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्याव यांनी माजी लष्करप्रमुख थेन सेन यांच्याकडून सुत्रे स्विकारली. (30 मार्च 2016) स्यू की यांनी परराष्ट्रमंत्रीपदी शपथ घेतली.
  • नेपाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी प्रथमच महिला सुशीला करकी यांची निवड करण्यात आली (15 मार्च 2016)
  • म्यानमारच्या संसदेत झालेल्या मतदानामध्ये एकूण 652 मतांपैकी क्वाय यांना 360 मते मिळाली.
  • बँक ऑफ द वेस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नंदिता बक्षी यांची निवड करण्यात आली.
  • व्हिएतनाम संसदेच्या प्रथमच महिला सभापतीपदी नग्युसेन यांची निवड झाली.
  • युक्रेनच्या पंतप्रधानपदी वोलोदिमिर ग्रोइसमन यांची नियुक्ती.
  • अमेरिकेच्या सायबर सुरक्षा आयोगाच्या सदस्यपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची नियुक्ती करण्यात आली.
  • कॅनडा कॅलगरी विद्यापीठात वेटनगरी फॅकल्टिचे डिन म्हणून भारतीय वंशाचे बलजितसिंग यांची डिन म्हणून नियुक्ती.
  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियाना अंतर्गत ‘डिजीटल गुडडा-गुड्डी’ उपक्रम राबविणारे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल (जळगाव) या माध्यमातून ऑनलाईन मुला-मुलींच्या जन्मदराचे अवलोकन करता येणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.