9 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

9 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2022)

पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्तव्यपथ’चे उद्घाटन :

  • राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्य पथ असे नामकरण करण्यात आले. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मोदी बोलत होते.
  • नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
  • सुधारित मार्ग हा मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.ज्यामध्ये नवे संसद भवन, नवीन सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान यांचा समावेश आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘इंडिया गेट’ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळय़ाचे अनावरण केले.
  • हा पुतळा केंद्राच्या 13,450 कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.
  • काळय़ा रंगाच्या ग्रॅनाइटचा हा पुतळा 280 मेट्रिक टंन वजनाचा आहे. पुतळय़ासाठीचा ग्रॅनाइट तेलंगणातून दिल्लीला नेण्यात आला आणि दोन महिन्यांत पुतळा कोरण्यात आला.

भारत, चिनी सैन्याची ‘धोरणात्मक माघार’ :

  • गेल्या दोन वर्षांपासून लडाख सीमेवर असलेला तणाव निवळत असून गोग्रा-हॉटस्प्रिंग भागात तळ टाकून बसलेल्या भारत आणि चीनच्या सैन्यांची ‘धोरणात्मक माघार’ सुरू झाली आहे.
  • भारत आणि चीनच्या सैन्यदलांनी सादर केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली.
  • 2020 मध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर डोकलाममध्ये मोठी चकमक झडली होती.
  • त्यानंतर लडाख सीमेवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जुलै महिन्यात दोन्ही सैन्यदलांमध्ये कमांडर पातळीवर चर्चेची 16वी फेरी झाली होती.
  • त्यात निश्चित झालेल्या धोरणानुसार पेट्रोिलग चौकी क्रमांक 15 (पीपी-15) येथील सैन्यांची माघार गुरुवारी सुरू झाल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

हाजी अली दर्गा परिसरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ :

  • हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे.
  • या दर्ग्याचे नुतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे.
  • तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले.

भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी दणदणीत विजय :

  • आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-4 फेरीतील सामने सुरू आहेत.
  • यूएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे.
  • याआधी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावल्यामुळे अफगाणिस्तान बरोबरच भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे.
  • त्यामुळे सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळवला जाणार आहे.
  • दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष :

  • 9 सप्टेंबर हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.
  • 9 सप्टेंबर 1850 मध्ये कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
  • ताजिकिस्ता देश सोविएत 9 सप्टेंबर 1991 मध्ये युनियनपासून स्वतंत्र झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.