5 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 नोव्हेंबर 2020)

टीआरपी यंत्रणेच्या फेरआढाव्यासाठी समिती :

  • मुंबईत उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा (टीआरपी) फेरआढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी हेम्पती यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली.
  • तर ही समिती दोन महिन्यांत मंत्रालयाला अहवाल सादर करेल. त्यानंतर टीआरपीसंदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
  • पैसे देऊन एखाद्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा टीआरपी वाढवण्याचा गैरप्रकार समोर आला असून त्याची व्याप्ती देशभर असण्याची शक्यता मानली जाते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आत्तापर्यंत दहा जणांना अटकही केली असून काही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
  • तसेच या घोटाळ्याची गंभीर दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सध्या अमलात आणल्या जात असलेल्या ‘टीआरपी’ पद्धतीतील त्रुटी, त्यातील पळवाट, संभाव्य गैरव्यवहार आदी विविध मुद्दय़ांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • टीआरपीची विद्यमान यंत्रणा (रेटिंग एजन्सी) 2014 मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कार्यरत आहे. गेल्या सहा वर्षांत दूरचित्रवाणी क्षेत्रात झालेल्या बदलानुरूप रेटिंग व्यवस्थेतही सुधारणा करण्याची गरज आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं दाखल :

  • तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती.
  • भारताने फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.
  • तर 29 जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमानं भारतात दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.
  • दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.
  • तसेच जून 1997 मध्ये रशियाच्या सुखोई-30 या लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामिल झाल्यानंतर 23 वर्षांनंतर राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यात आली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दल अधिक आक्रमक होणार असून त्यांची क्षमताही वाढली आहे.

अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा :

  • भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.
  • कनेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.
  • जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
  • पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • जादव यांनी एकट्याने उभ्या केलेल्या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात. या जंगलाचा आकार न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठा आहे. हे जंगला आता बंगाल टायगर, भारतीय गेंडे, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 100 हून अधिक प्रजातीची हरणं आणि ससे यांचा अधिवास आहे.

मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती :

  • वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.
  • सॅम्यूएल्स डिसेंबर 2018मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
  • तर 39 वर्षीय सॅम्यूएल्सने 79 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 11 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून 150 बळीही मिळवले आहेत.

आयसीसी क्रमवारीत कोहली, रोहितची मुसंडी :

  • भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानांवर कायम आहेत.
  • कोहली (871) अग्रस्थानी असून रोहित (855) दुसऱ्या स्थानावर आहे. करोना साथीमुळे एकदिवसीय क्रिकेट गेल्या सात महिन्यांपासून कोहली आणि रोहितने खेळलेले नाही. मात्र तरीदेखील अव्वल दोन स्थाने त्यांना राखता आली आहेत.
  • कोहली आणि रोहित वगळता भारताचा एकही फलंदाज अव्वल 10 जणांमध्ये नाही. गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमरा (719) दुसऱ्या स्थानी कायम आहे. बुमरा वगळता भारताचा एकही गोलंदाज अव्वल 10 मध्ये नाही.
  • तर ‘आयसीसी’ सांघिक क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी कायम असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष:

  • 5 नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सन 1824 मध्ये जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
  • सन 1929 पासून जी.आय.पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
  • बी.बी.सी.आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन 5 नोव्हेंबर सन 1951 रोजी पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
  • भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहोली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 मध्ये झाला.
  • गुगलने ने 2007 या वर्षापासून अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
  • भारताने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.