22 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

लिसा स्थळेकर
लिसा स्थळेकर

22 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 जून 2022)

लिसा स्थळेकर क्रिकेटपटूंच्या महासंघाची पहिली महिला अध्यक्ष :

  • दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकर ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघाची (एफआयसीए) पहिली महिला अध्यक्ष असणार आहे.
  • स्वित्झर्लंडच्या न्यो येथे झालेल्या ‘एफआयसीए’च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ऑस्ट्रेलियाची 42 वर्षीय माजी कर्णधार स्थळेकरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज बॅरी रिचर्डस, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू जिमी अ‍ॅडम्स आणि इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
  • ‘एफआयसीए’ आणि खेळाडूंची जागतिक संघटना यांमध्ये झालेल्या खेळाडू विकास परिषदेआधी कार्यकारिणी समितीची बैठक झाली.
  • स्थळेकरने ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही प्रकारांत मिळून 187 आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.
  • 2005 व 2013 या एकदिवसीय विश्वचषक आणि 2010 व 2012च्या ट्वेन्टी-20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघातही तिचा सहभाग होता.
  • 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर तिने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2022)

तमिळनाडूत तीन नव्या पालींचा शोध :

  • तमिळनाडूत तीन नव्या पालींचा शोध लावण्यात आला आहे.
  • ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी दुर्मिळ अशा तीन पालींचा शोध लावला आहे.
  • जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांच्या संबंधातील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
  • या तिन्ही पाली ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या आहेत.
  • यामध्ये ‘निमॉस्पीस अळगू’, ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ आणि ‘निमॉस्पीस मुंदाथुराईएनसीस’ या तीन पालींचा समावेश आहे.
  • जगभरात पालींच्या 150 हून अधिक प्रजाती आढळून येतात.
  • आत्तापर्यंत पश्चिम घाटात ‘निमॉस्पीस’ प्रजातीच्या तब्बल 47 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य स्पर्धेत प्रवेश करणारी सानिया एकमेव भारतीय :

  • लंडनमधील ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’ येथे वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
  • यावर्षीची विम्बल्डन टेनिस स्पर्धा 27 जून ते 10 जुलै दरम्यान होणार आहे.
  • 21 जून या स्पर्धेची पात्रता फेरी खेळवली जात आहे.
  • भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन हे पात्रता फेरीतूनच बाहेर पडले आहेत.
  • त्यामुळे भारताच्या सर्व आशा आता सानिया मिर्झावर असतील.

भारताचा अमेरिकेवर शानदार विजय :

  • भारतीय महिला हॉकी संघाने दिमाखदार पुनरागमन करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4-2 असा विजय मिळवला.
  • अमेरिकेकडून डॅनिएल ग्रेगाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
  • यानंतर भारताच्या दिप ग्रेस एक्का, नवनीत कौर आणि सोनिका यांनी गोल झळकावत संघाला 3-1 अशा मजबूत स्थितीत पोहोचवले.
  • यानंतर वंदना कटारियाने मैदानी गोल करीत भारताची आघाडी 4-2 अशी केली.
  • संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय निश्चित केला.

दिनविशेष :

  • 22 जून सन 1757 मध्ये प्लासीची लढाई सुरू झाली.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन 22 जून 1940 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण 22 जून 1994 मध्ये जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना 30 टक्‍के आरक्षण.
  • अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून 22 जून 2007 रोजी त्या पृथ्वीवर परत आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.