17 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जगदीप धनकड
जगदीप धनकड

17 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 जुलै 2022)

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी :

  • भाजपाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली आहे.
  • तर या निवडणुकीसाठी भाजपाने पश्चिम बंगलाचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे.
  • जगदीप धनकड सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.
  • तर या पदावर असताना ममता बॅनर्जी आणि धनकड यांच्यात अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष झालेला पाहायला मिळालेला आहे.
  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याच धनकड यांच्या उमेदवारीची आज घोषणा केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जुलै 2022)

संसदेच्या आवारात निदर्शनांना मनाई :

  • संसदेच्या आवारात धरणे, निदर्शनांना मनाई करणारा आदेश शुक्रवारी राज्यसभेच्या सचिवालयाने काढला.
  • विरोधकांनी या आदेशावर आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण झाला.
  • संसद भवनाच्या परिसरात यापुढे निदर्शने, धरणे, उपोषण किंवा धार्मिक समारंभ करता येणार नाहीत, असे शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
  • निदर्शने वा धरणे धरण्यास मनाई करणारे परिपत्रक अधिवेशनाच्या काळात काढले जात असल्याचे सचिवालयातील सूत्रांनी सांगितले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात ऐश्वर्यला सुवर्ण :

  • भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंहने शनिवारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
  • ऐश्वर्यने अंतिम लढतीत 2018च्या युवा ऑलिम्पिक विजेत्या हंगेरीच्या झलान पेकलरला 16-12 असे हरवले.
  • कनिष्ठ विश्वविजेत्या ऐश्वर्यने पात्रता फेरीत 593 गुणांची कमाई केली होती.
  • तसेच हे ऐश्वर्यचे दुसरे विश्वचषक सुवर्णपदक आहे. याआधी त्याने गेल्या वर्षी नवी दिल्लीमध्ये मिळवले होते.
  • तर चैन सिंगला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • मध्य प्रदेशच्या ऐश्वर्यने भारताच्या खात्यावर चौथ्या सुवर्णपदकाची भर घातली.
  • पदकतालिकेत आघाडीवर असलेल्या भारताने चार सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण नऊ पदके आतापर्यंत कमावली आहेत.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात साबळे अंतिम फेरीत :

  • महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने अपेक्षेप्रमाणेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठली.
  • दोहा येथे 2019मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या भारताच्या 27 वर्षीय साबळेने तिसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत 8:18.75 मिनिटे अशी वेळ नोंदवली.
  • तर स्पर्धेच्या तीन शर्यतींमधील अव्वल तीन स्पर्धक आणि त्यानंतरचे सहा वेगवान धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
  • साबळेने जूनमध्ये प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवताना 8:12.48 मिनिटांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

दिनविशेष :

  • 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.
  • सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
  • दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.
  • वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.
  • कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.