16 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक ओझोन संरक्षण दिन
जागतिक ओझोन संरक्षण दिन

16 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2021)

पंतप्रधान मोदी यांचा प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश :

  • टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश आहे.
  • साप्ताहिकाने बुधवारी शंभर प्रभावशाली व्यक्तींची 2021 या वर्षाची यादी जाहीर केली असून त्यात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.
  • टाइमच्या यादीत टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अ‍ॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचा समावेश आहे.
  • टाइमने म्हटले आहे की, भारताला तीन नेत्यांनी दिशा दिली. त्यात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.

उत्तराखंडच्या राज्यपालपदी गुरमित सिंग यांचा शपथविधी :

  • लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमित सिंग यांनी बुधवारी उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
  • राजभवनात झालेल्या समारंभात उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.एस. चौहान यांनी सिंग यांना पदाची शपथ दिली.
  • मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अगरवाल, पोलीस महासंचालक अशोक कुमार व मुख्य सचिव एस.एस. संधू यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी हजर होते. ले.ज. सिंग हे बेबी रानी मौर्य यांच्या जागी आले आहेत.
  • तर मौर्य यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिला होता.
  • भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झालेले सिंग यांनी लष्करी सेवेत अनेक पदके मिळवली होती. ते भारत- चीन व्यवहारांचे तज्ज्ञ मानले जातात.

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या :

  • जपान, दक्षिण कोरिया व अमेरिका यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली असतानाच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.
  • त्यामुळे दक्षिण व उत्तर कोरियाची लष्करी क्षमता वाढली आहे.
  • दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय प्रासादाने म्हटले आहे, की बुधवारी दुपारी पाण्यातून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • तीन हजार टनांच्या पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राने ठरवून दिलेले अंतर कापले.
  • दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले, की उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे ही मध्य -उत्तर कोरियातून बुधवारी सोडण्यात आली. त्यांनी 800 कि.मी अंतर 60 कि.मी उंचीवरून कापले.

सुनिल गावस्कर फाउंडेशनला मिळाला मुहूर्त :

  • सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला ही जमीन 33 वर्षांपूर्वी इंनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी दिली होती.
  • तर या जमिनीवर आता क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभं राहणार आहे. इतकी वर्षे मोकळा राहिलेला भूखंड वापरात येणार आहे.
  • तसेच या भूखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशिअर, स्विमिंग, पुल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व्यवस्था
  • आणि स्पोर्ट्स कॅफेटेरिया इत्यादी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • तसेच सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशनच्या विनंतीनुसार बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिल या खेळांना देखील परवानगी देण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी, खेळाडू यांना दुखापत झाल्यास त्यांच्यावर स्पोर्ट्स मेडिसीन सेंटर उभारण्याची देखील परवानगी दिली आहे.
  • खेळ प्रशिक्षण केंद्राला इनडोअर क्रिकेट स्टेडियम ऐवजी “मल्टी फॅसिलिटीज स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर व आऊटडोअर फॅसिलिटीज” असं नाव देण्याची मान्यता दिली आहे.

दिनविशेष :

  • 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो.
  • निसर्ग कवी, शेतकरी, आमदार अशी ओळख असलेले प्रख्यात “ना.धों. महानोर” (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.