15 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

गोताबया राजपक्षे
गोताबया राजपक्षे

15 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 जुलै 2022)

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचा राजीनामा :

  • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.
  • राजपक्षे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना पाठवला आहे.
  • राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले.
  • तर त्यांनी देश सोडल्यानंतर काही तासांत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जुलै 2022)

देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण :

  • गुरुवारी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे.
  • मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे.
  • संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे.
  • तसेच त्याच्या संपर्कात 11 जण आल्याचेदेखील पुढे आले आहे.
  • तर या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
  • मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात.
  • तर हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले.
  • हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात भारत अव्वल :

  • नेमबाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले.
  • भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली.
  • यामध्ये महाराष्ट्राच्या शाहूने सांघिक गटांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली.
  • भारताच्या अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा या त्रिकुटाने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कोरियाला 17-15 असे पराभूत करत देशासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले.
  • अर्जुन आणि शाहूचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.
  • पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने इटलीकडून 15-17 असा पराभव पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • दिवसाचे तिसरे रौप्यपदक भारताने 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक गटात मिळवले.

दिनविशेष :

  • 15 जुलै 1955 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
  • ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा 15 जुलै 1962 मध्ये पुणे येथे प्रारंभ.
  • 15 जुलै 2006 मध्ये ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.