स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेबद्दल माहिती

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेबद्दल माहिती

 • 1 एप्रिल 1999 पासून पुढील 6 योजनांचे एकत्रिकरण करून ही योजना सुरू करण्यात आली.
 1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
 2. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण
 3. ग्रामीण क्षेत्रातील स्त्रीया व मुलांचा विकास
 4. दशलक्ष विहीरींची योजना
 5. गंगा कल्याण योजना ग्रामीण
 6. ग्रामीण कारागीरांना सुधारित औजारांचा पुरवठा
 • या योजनेची उद्दिष्टे –

 • या योजनेत स्वयंम रोजगाराच्या सर्व बाबींचा सर्वांगिण विचार करण्यात आला आहे. त्यामध्ये गरीब लोकांना स्वयं-सहाय्यता गटांमध्ये संघटित करणे, प्रशिक्षण, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा तसेच विपणन इत्यादींचा समावेश आहे.
 • या योजनेत अनेक संस्थांचे एकात्मीकरण घडवून आणण्यात आले आहे-जिल्हा ग्रामीण विकास मंडळे, बँका, पंचायत राजसंस्था, NGOs आणि इतर निम-सरकारी संस्था इत्यादी.
 • ग्रामीण कुटुंबांना बँक पतपुरवठा आणि सरकारी अनुदाने यांच्या सहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी 3 वर्षाच्या कालावधीत दारिद्र्य रेषेच्या वर आणणे हे या योजनेचे मूल उद्दीष्ट आहे.
 • या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न बँकेचा हफ्ता वजा जाता किमान 2000 रुपये प्रतिमाह मिळवा.
 • योजनेंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प किमतीच्या 30% किंवा कमाल 7,500 रुपये एवढे आहे. SCs/STs साठी ते 50% किंवा कमाल 10,000 रुपये एवढे आहे. व्यक्तीच्या गटासाठी अनुदान 50% असून कमाल 1.25 लाख रुपये आहे.
 • जलसिंचन प्रकल्पासाठी अनुदानाची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
 • योजनेचा निधीपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो .
 • ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे या योजनेचे लक्ष्य गट आहेत.
 • मात्र त्यातही दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा आहेत.
 • एकूण सुविधांपैकी 50% SCs/STs साठी 40% स्त्रियांसाठी तर 3% अपंगांसाठी राखून ठेवण्यात आली आहे.
 • ग्रामीण गरिबांच्या स्वयंरोजगारासाठी ही सध्या एकच योजना आहे.

    

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.