STI Pre Exam Question Set 3

STI Pre Exam Question Set 3

1. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.

  1.  100, 525
  2.  125, 450
  3.  100, 500
  4.  125, 500

उत्तर : 125, 500


2. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.

  1.  750
  2.  7500
  3.  7700
  4.  770

उत्तर : 7500

3. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.

  1.  13 सेंमी
  2.  7 सेंमी
  3.  10 सेंमी
  4.  8 सेंमी

उत्तर : 10 सेंमी


4. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?

5,8,11,14, —–.

  1.  21
  2.  23
  3.  24
  4.  22

उत्तर : 21


5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?

  1.  4
  2.  3
  3.  5  
  4.  8  

उत्तर : 4


6. 4,10,12,24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणार्‍या संख्या प्रमाणात येतील?

  1.  5
  2.  2
  3.  3
  4.  4

उत्तर : 4


7. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्‍या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?

  1.  1776
  2.  1876
  3.  1666
  4.  1676

उत्तर : 1776


8. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या?

  1.  24
  2.  22
  3.  18
  4.  28

उत्तर : 18


9. कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, जर एकूण मुले 484 असतील, तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?

  1.  24
  2.  22
  3.  18
  4.  28

उत्तर : 22


10. एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

  1.  34
  2.  62
  3.  43
  4.  26

उत्तर : 26


11. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला, तर त्या गोलाची त्रिज्या किती?

  1.  7 सेंमी
  2.  7 सेंमी
  3.  8 सेंमी
  4.  9 सेंमी

उत्तर : 7 सेंमी


12. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

  1.  1500
  2.  2000
  3.  3000
  4.  2500

उत्तर : 3000


13. जर 60 वॉटच विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभावांतर असलेल्या स्त्रोतास जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?

  1.  27.27 A
  2.  2.727 A
  3.  272.7 A
  4.  0.2727 A

उत्तर : 0.2727 A


14. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?

  1.  अष्टकाचे तत्व
  2.  मूलद्र्व्यांचे अणूअंक
  3.  मूलद्रव्यांचे अणूवस्तुमान
  4.  मूलद्र्व्यांचे त्रिकांचे अस्तित्व

उत्तर : मूलद्र्व्यांचे अणूअंक


15. वांरवारतेचे S.I. एकक काय आहे?

  1.  न्यूटन
  2.  वॉट
  3.  हर्टत्झ
  4.  ज्युल

उत्तर : हर्टत्झ


16. लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.

  1.  मंदगती
  2.  जलदगती
  3.  उष्माग्राही
  4.  जलदगती व उष्माग्राही

उत्तर : मंदगती


17. —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.

  1.  गनोर्हिर्‍या
  2.  चिकूनगुनिया
  3.  सिफीलिस
  4.  कॅक्राईड

उत्तर : चिकूनगुनिया


18. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?

  1.  बहुवार्षिक
  2.  वार्षिक
  3.  व्दिवार्षिक
  4.  रोपटे

उत्तर : व्दिवार्षिक


19. ‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

  1.  जगदीश चंद्र बोस
  2.  कॅमिलो गॉल्गी
  3.  रॉबर्ट हुक
  4.  रॉबर्ट ब्राऊन

उत्तर : रॉबर्ट हुक


20. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?

  1.  दृढ
  2.  पृष्ठभागीय
  3.  स्थूलकोन
  4.  हरित   

उत्तर : दृढ

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World