रोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती

रोजगार व बेरोजगारी बद्दल संपूर्ण माहिती

Must Read (नक्की वाचा):

भारताची राज्यघटना

 • आपल्या जीवनात व्यक्ति म्हणून समाजाचे सदस्य म्हणून कामाची/रोजगाराची महत्वाची भूमिका असते. हे पुढील मुद्यांवरून स्पष्ट होईल.
 • लोक स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काम करतात.
 • रोजगारामुळे स्वमुल्याची आणि आत्मसन्मानची भावना निर्माण होते.
 • प्रत्येक कार्यरत व्यक्ति राष्ट्रीय उत्पन्नात तसेच देशाच्या विकासात भर घालत असतो.

 मूलभूत संकल्पना :

कामगार म्हणजे काय?

 • उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याव्दारे राष्ट्रीय उत्पादात भर घालण्यार्‍या सर्व व्यक्तींना कामगार (worker) असे म्हणतात.
 • आजार, इजा, प्रतिकूल हवामान, सण, सामाजिक किंवा धार्मिक समारंभ अशा कोणत्याही कारणांमुळे कामाहून तात्पुरता गैरहजर राहणारा व्यक्तीसुद्धा कामगारच असतो.
 • मुख्य कामगारांना मदत करणारे व्यक्तींचा सुद्धा समावेश कामगारांमध्ये होतो.
 • कामगारांमध्ये स्वयं-रोजगारी तसेच नोकरी करून पगार मिळविण्याचा समावेश होतो.

 कामगारांचे वर्गीकरण :

 • कामगारांचे त्यांच्या रोजगाराच्या स्तरावरून तीन गट केले जातात.

नियमित पगारदार/मजुरी कामगार (Regular Salaried/Wage Employees) –

 • हे इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात नियमित आधारावर पगार किंवा मजुरी मिळवितात.
 • त्यामध्ये काल मजुरीबरोबरच (time wage) अंश मजुरी (piece wage) मिळविणार्‍या चाही समावेश होतो.

किरकोळ मजुरी कामगार (Casual Wage Labour) –

 • हे कामगार इतरांच्या कृषि किंवा गैर-कृषि उपक्रमांमध्ये (घरगुती तसेच गैर-घरगुती) काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार दैनिक किंवा ठराविक कलावधिनुसार मजुरी मिळवितात.

स्वंय-रोजगारी (Self-Employed) –

 • हे व्यक्ती स्वत:चे कृषि किंवा गैर-कृषि उपक्रम चालवितात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे किंवा भागीदारांसहीत गुंतलेले असतात.
 • त्यांचे अजून तीन गट केले जातात.

स्वयं – लेखा कामगार (Own-account Workers)  –

 • भाडोत्री कामगारांविना आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे

रोजगार देणारे (Employers) –

 • भाडोत्री कामगारांच्या सहाय्याने आपला उपक्रम/व्यवसाय चालविणारे

 मदतनीस (Helpers) –

 • स्वत:च्या घरगुती उपक्रमांमध्ये पूर्ण किंवा अंशकालीन काम करणारे असे व्यक्ती ज्यांना कोणताही नियमित मोबदला मिळत नाही.

 काही व्याख्या :

श्रम शक्ती (Labour Force) –

श्रम शक्तिमध्ये काम करण्यार्‍या किंवा काम शोधत असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध आलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतो.

 

श्रम शक्ती सहभाग दर (Labour Force Participation Rate) –

देशाच्या एकूण लोकसंख्येत श्रम शक्तीचे प्रमाण.

 

कार्य शक्ती (Work Force) –

श्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या  व्यक्तींची संख्या.

 

कार्य सहभाग दर (Work Participation Rate) –

श्रम शक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेल्या व्यक्तींचे प्रमाण.

 

बेरोजगारी दर (Unemployment Rate) –

श्रम शक्तीपैकी रोजगार प्राप्त नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण.

 संघटित व असंघटित क्षेत्र :

 • कार्य शक्तीचे विभाजन दोन गटात केले जाते: संघटित क्षेत्रातील कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगार.
 • संघटित क्षेत्रातील कामगारांचे कामगार कायद्यांव्दारे संरक्षण केले जाते.
 • हे कामगार आपल्या ट्रेड युनियन स्थापना करून मालकांशी चांगली मजुरी व सामाजिक सुरक्षेच्या उपायांसाठी (पेन्शन, प्रोव्हिडन्ड फंड, ग्रॅच्युईटी, मातृत्व लाभ इ.) वाटाघाटी करू शकतात.
 • सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्यार व्यक्तींचा तसेच 10 किंवा अधिक कामगरांना रोजगार देणार्यार खाजगी क्षेत्रातील उधोगांमध्ये/उपक्रमांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो.
 • उर्वरित उधोगांमधील/उपक्रमांमधील कामगारांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. त्यांना वरील प्रमाणे लाभ उपलब्ध होत नाही.
 • त्यांमध्ये हजारो शेतकरी, शेतमजुर, छोटया उपक्रमांचे मालक, भाडोत्री कामगार नसलेले स्वयं-रोजगारी व्यक्ती इत्यंदींचा समावेश होतो.

 बेरोजगारी (Unemployment) :

 • अर्थ: रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.
 • रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी.
 • या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.

 बेरोजगारीचे प्रकार :

खुली बेरोजगारी (Open Unemployment) –

 • काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.
 • उदा. ग्रामीण भागातील स्वत:च्या मालकीची शेत जमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार, रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार इ.

हंगामी बेरोजगारी (Seasonal Unemployment) –

 • शेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.
 • अशा प्रकारची बेरोजगारी वुलन कापडाचे कारखाने, आईसक्रिमचे कारखाने इत्यादींमध्येही निर्माण होऊ शकते.

अदृश्य/ प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment) –

 • आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते.
 • उदा. शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4-5 लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात.
 • सकृतदर्शनी या व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपाचे मुळीच नसते.
 • म्हणजेच त्यांची सीमान्त उत्पादकता (Marginal Productivity) शून्य किंवा नाममात्र असते.
 • कारण अशा व्यक्तींना व्यासायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.

कमी प्रतीची बेरोजगारी (Underemployment) –

 • ज्यावेळी एखाधा व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा/कार्यक्षमतेपेक्षा/शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते त्यावेळी तिला कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात.
 • उदा. एखाधा इंजिनिअरला क्लार्कची नोकरी करावी लागणे.

सुशिक्षित बेरोजगारी (Educated Unemployment) –

 • जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात.

चक्रीय बेरोजगारी (Cyclic Unemployment) –

 • विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात.

घर्षणात्मक बेरोजगारी (Frictional Unemployment) –

 • विकसित देशांना जेव्हा नवीन उधोग जुन्या उधोगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.
 • असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उधोगांमध्ये निर्माण झालेले असतात.)

संरचनात्मक बेरोजगारी (Structural unemployment) –

 • विकसनशील देशांमध्ये उत्पादनक्षमता (Productive capacity) कमी असते.
 • उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय.

भारतात रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप (Employment and Unemployment Measurement in India) :

 • भारतात बेरोजगारीविषयक आकड्यांचे तीन प्रमुख स्त्रोत आहेत.
 1. दशवार्षिक जनगणनेचे अहवाल,
 2. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे (NSSO) रोजगार व बेरोजगाराबाबतचे अहवाल, आणि
 3. रोजगार व प्रशिक्षण सरसंचालनालय (DGET) यांकडील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजकडे झालेल्या नोंदणीची आकडेवारी.
 • यांपैकी NSSO चे अहवाल सर्वात महत्वाचे मानले जातात.
 • NSSO मार्फत 1972-73 पासून (आपल्या 27 व्या फेरीपासून भारतातील रोजगार व बेरोजगाराच्या परिस्थितीबाबतची राष्ट्रास्तरीय आकडेवारी जमा करण्यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे (quinquennial surveys) केली जातात.
 • NSSO सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते: नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (UPSS), चालू साप्ताहिक दर्जा (CWS) आणि चालू दैनिक दर्जा (CDS).

नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा (Usual Principal and Sub-sidiary Status: UPSS) –

 • यामध्ये व्यक्तीच्या गेल्या 365 दिवसांमधील प्रमुख आर्थिक कार्यकृतीचा, आणि 30 दिवसांमधील अधिक कलावधीसाठी केलेल्या दुय्यम आर्थिक कृतीचा समावेश होतो.

चालू साप्ताहिक दर्जा (Current Weekly Status: CWS) –

 • यामध्ये व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.
 • या आधारावर गेल्या 7 दिवसांत कोणत्याही एका दिवसात किमान एक तास काम करणार्यायला रोजगारी समजले जाते.

चालू दैनिक दर्जा (Current Daily Status : CDS) –

 • यामध्येही व्यक्तीच्या गेल्या 7 दिवसांतील आर्थिक कृतींचा समावेश होतो.
 • या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवडयात दररोज किमान 4 तास काम करणे आवश्यक असते.
Must Read (नक्की वाचा):

अर्थव्यवस्थांचे प्रकार

You might also like
1 Comment
 1. किरण विखे says

  किरण विखे
  रा,नागमठाण,
  ता, वैजापूर
  जि, औरंगाबाद

Leave A Reply

Your email address will not be published.