प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (Pradhan Mantri Khanij Kalyan Yojana (PMKKY)

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (Pradhan Mantri Khanij Kalyan Yojana (PMKKY)

योजनेची सुरुवात – प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची सुरुवात केंद्र सरकारव्दारे 17 सप्टेंबर 2015 रोजी करण्यात आली.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा उद्देश – खाणकाम प्रभावित झालेल्या क्षेत्राचा विकास व त्या क्षेत्रात राहणार्‍या लोकांचा विकास करणे.

*प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची घोषणा केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यामार्फत करण्यात आली.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचे प्रमुख बिंदु –

1.या योजने अंतर्गत खाणकामामुळे पर्यावरणावर होणार्‍या दुष्परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे.

2.स्थानिक व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

3.खाणकाम क्षेत्राच्या विकासाबरोबर त्या ठिकाणच्या रहिवाशांच्या कल्याणासाठी कार्य करणे.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या सुविधा –

1.आरोग्यासंबंधी सेवांची सुविधा उपलब्ध करणे.

2.स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे.

3.कौशल्यांचा विकास करणे.

4.शिक्षण सुविधा

5.लहान मुले व स्त्रियांसाठी सेवा उपलब्ध करणे

6.अपंग आणि वृद्ध व्यक्तींसाठी कल्याणकारी उपाय योजने

*प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेसाठी निधी हा जिल्हा खनिज फाउंडेशन (District Mineral Foundations-DMFs) मार्फत उपलब्ध केला जाईल. ज्यामधील 60% निधीचा उपयोग खालील घटकांसाठी केला जाईल.

1.पर्यावरण विकास

2.कौशल्य विकास

3.पूल व रस्त्यांनी निर्मिती

4.रेल्वे

5.शेतकर्‍यांसाठी सिंचन सुविधा

6.जलमार्ग योजना

*या सर्वांसाठी लागणारा निधी DMFs मार्फत आपल्या आपल्या क्षेत्रातून मिळेल. या दिशेने 12 जानेवारी 2015 ला केंद्र सरकारने खाण आणि खनिज संशोधन नियम जाहीर केले. ते पुढीलप्रमाणे –

खाणमालकाने 12 ऑक्टोबर 2015 च्या अगोदर खणन कार्य दीर्घ मुदतीसाठी घेतले आहे. ते DMFs ला देण्यात येणारी रॉयल्टी पेमेंटच्या अतिरिक्त भूगतान करतील, जे 30% पेक्षा अधिक असेल.

ज्या खाणमालकाने दीर्घ मुदत 12 जानेवारी 2015 नंतर घेतली आहे, ते रॉयल्टी पेमेंटमधून 10% अधिकचे भूगतान करतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.