प्रधानमंत्री जन औषधी योजना (Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana)
प्रधानमंत्री जन औषधी योजना (Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana)
योजनेची सुरुवात – प्रधानमंत्री जन औषधी योजनेची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी नवी दिल्ली येथून करण्यात आली.
योजनेचा उद्देश – औषधांच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असणार्या रुग्णांना दिलासा देणे.
*प्रधानमंत्री जन औषधी योजनेची सुरुवात संपूर्ण देशात BPPI (Bureau of Pharama Public Sector undertakings of India) मार्फत करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (Pradhan Mantri Khanij Kalyan Yojana (PMKKY)
काय आहे जन औषध योजना ?
1. जन औषध योजना एक अभियान आहे, जे सर्वसामान्य जनतेसाठी कमी किमतीवर चांगल्या गुणवत्तेची औषधे उपलब्ध करून देते.
2. जन औषध अभियान केंद्रीय फार्मा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या सहकार्यापासून फार्मास्युटिकल्स विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
जन औषधी योजनेचे लाभ –
1. मोठ्यात मोठा व घातक आजाराच्या उपचारासाठी जन औषध गोळ्या उपलब्ध करण्याबरोबर अशी औषधी जनतेच्या बजेटमध्ये असतील.
2. कमी किमतीच्या औषधांबरोबर गुणवत्तेची पूर्ण खात्री जन औषध योजनेने व्यक्तींना व विक्रेत्यांना दिली आहे.
3. प्रतिजैविक औषधांच्या प्रति जनतेच जागरूक करण्याचे कार्य जन औषध अभियानाअंतर्गत केले जाते.
4. प्रतिजैविक औषधाच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनाही यांच्या गुणवत्तेबद्दल जागृत करण्याचे काम जन औषध अभियानाअंतर्गत केले जाते.
जन औषध स्टोअर कोण खोलू शकते ?
1.कोणीही ज्यांच्याजवळ Pharmacist ची पदवी आहे. यामध्ये व्यक्ती, NGO किंवा कोणतेही इन्स्टिट्यूट जन औषध योजनेसाठी फॉर्म भरू शकते.
2. जर एखादी व्यक्ती जन औषधांसाठी फॉर्म भरत आहे तेव्हा त्याच्याजवळ शॉप (दुकान) साठी योग्य जागा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ती व्यक्ती इतर संस्थांअंतर्गत कार्यरत असू नये.
काय असते प्रतिजैविक औषध ?
1. जन औषध योजनेअंतर्गत असणारी प्रतिजैविक औषधे ब्रॅंडेड असत नाहीत, परंतु हे ब्रॅंडेड औषधांप्रमाणे प्रभावी असतात.
जन औषध योजनेत दुकान (स्टोअर) उभे करण्यासाठी सरकारी मदत
1. जन औषध स्टोअर खुले करण्यासाठी सरकार स्टोअर मालकाला 2 लाख रु. देईल, त्याचबरोबर संगणक खरेदी करण्यासाठी 50 हजार रु.ची मदत दिली जाईल.
2. जन औषध स्टोअर मालकास औषधे MRP च्या 16% कमी किमतीने मिळतील.
3. जन औषधे योजनेअंतर्गत सरकार करण्यात येणार्या औषध विक्रीकर इन्सेंटिव्ह ही देईल.
*जन औषध योजनेअंतर्गत संपूर्ण देशात सध्या 85 पेक्षा अधिक जन औषध स्टोअरचे व्यवस्थापन करण्यात येत आहे, ज्यामध्ये साधारणत: 361 प्रकारची औषध विक्री करण्यात येईल.
जन औषध योजनेचे लक्ष्य –
1. देशांतील 630 जिल्ह्यांमध्ये कमीत कमी एक स्टोअर उपलब्ध करणे.