नवसंजीवनी योजनेबद्दल संपूर्ण माहिती

नवसंजीवनी योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • आदिवासी भागातील माता मृत्यू प्रमाण आणि अर्भक मृयुदर कमी व्हावेत या उद्देशाने 15 जिल्ह्यांतील आदिवासी भागातील 8,419 गावांमध्ये नवसंजीवनी योजना राबविण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी व एक वाहन असलेली अशी 172 फिरती वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत.
  • ही पथके सर्व गावे व वाड्यांना भेटी देऊन कुपोषित व आजारी बालकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी वैद्यकीय सेवा पुरवितात.
  • माता मृत्युदर आणि अर्भक मृत्युदर कमी व्हावेत याकरिता नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान, दाई बैठका, मान्सूनपूर्व उपाययोजना, आहार व बुडीत मजुरी तरतूद इ. सारख्या विविध योजना राबविण्यात येते आहेत.
  • आदिवासी भागातील गरोदर महिलांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक त्या औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणीकरिता वैधकीय केंद्राला भेट देण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला रु 400 ची औषधे पुरविण्यात येतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.