नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)
- पहिली प्राथमिक शाळा कोठे सुरू झाली? पुणे.
- खोपोली हे कोणत्या प्रकारचे विद्युत केंद्र आहे? जलविद्युत.
- कोल्हापूर जिल्ह्यात कोणते जलविद्युत केंद्र आहे? राधानगरी.
- कोयना धरणाची भिंत किती लांब आहे? 800 मी.
- कोयना धरणाची उंची किती आहे? 85 मी.
- विद्युत निर्मिती नंतर कोयना नदीचे पाणी कोणत्या नदीत सोडतात? वशीष्टी.
- कोणत्या नदिस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना.
- देहु-आळंदी हे गाव कोणत्या नदीकाठी आहे? इंद्रायणी.
- यंत्रे व यंत्राचे भाग कोणत्या जिल्ह्यात बनतात? पुणे.
- तळेगाव-ओगलेवाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? काचसामान बनवण्याचे.
- सातारा किर्लोस्करवाडी येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत? शेती अवजारे.
- चादरीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? सोलापूर.
- घारापुरीची कोरीव लेणी कोठे आहे? मुंबई जवळ.
- दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहरास संबोधले जाते? पैठण.
- पेशवे उद्यान, सारसबाग हे कोणत्या शहरात आहे? पुणे.
- अंबाबाईचे मंदिर कोणत्या शहरात आहे? कोल्हापूर.
- चंद्रभागा हे नाग कोणत्या नदीचे आहे? भीमा.
- पुण्याजवळ मुंडवा येथे कशाचा कारखाना आहे? कागद बनवण्याचा.
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोणत्या जिल्ह्यात बनवतात? पुणे.
- तीनही रेल्वेगेज असणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? मिरज.
- रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झाली? सातारा.
- प्रती सरकारची स्थापना कोणत्या शहरात झाली? सातारा.
- हळद उत्पादनासाठी कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख करतात? सांगली.
- महाराष्ट्रातील पहिला दुध भुकटी कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? मिरज.
- राधानगरी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर.
- गव्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? दाजीपूर.
- महाराष्ट्रातील कोरडवाहू संशोधन केंद्र कोठे आहे? सोलापूर.
- संत विद्यापीठ म्हणून या शहराचा उल्लेख करतात? पैठण.
- ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी कोठे लिहली? नेवासे.
- शेगांव या ठिकाणी कोणाची समाधी आहे? गजानन महाराज.
- प्रसिद्ध बाहुबलीची मूर्ती कोणत्या ठिकाणी आहे?- श्रवण बेळगोळा (कर्नाटक).
- कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम कोठे झाला आहे? माहुली.
- सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? सोलापूर.