नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)

 • गोदावरी नदी कोठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर.
 • स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? देवळाली नाशिक.
 • नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी.
 • गांगपूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? गोदावरी.
 • वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक.
 • कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे? द्राक्षे.
 • नाशिक शहर कोणाचे तीर्थक्षेत्र आहे? हिंदूचे.
 • संरक्षण साहित्य निर्मितीच्या ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक.
 • देवळाली कशासाठी प्रसिद्ध आहे? लष्कर छावणी.
 • संगमनेर शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे? प्रवरा.
 • भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर.
 • अहमदनगर जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? 55 सें.मी.
 • अहमदनगर जिल्हा कोणत्या खोर्‍यात वसला आहे? गोदावरी.
 • निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे? अहमदनगर.
 • केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव.
 • वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव.
 • चाळीसगांव-धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? जळगाव.
 • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे? जळगाव.
 • जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? 74 सें.मी.
 • पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा? धुळे.
 • सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्हयांशी संबंधीत आहे? नंदुरबार.
 • कोणत्या नदीच्या खोर्‍यात नंदुरबार जिल्हा वसला आहे? तापी.
 • नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रमाण किती टक्के आहे? 50%.
 • धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? सूरत-नागपूर.
 • भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव.
 • जळगाव जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग जातो? धुळे-कलकत्ता.
 • जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोर्‍यात वसला आहे? तापी.

  महाराष्ट्रात दुसर्‍यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती? तापी.

  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? नाशिक.

  मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यात येते? नाशिक.

  सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे? विडी उद्योग.

  नाशिक जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? 100 सें.मी.

  सिक्युरिटी प्रेस कोठे आहे? नाशिक.

  नेवासे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World