नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)
- डोंगर उताराची तांबडी माती कोठे आढळते? भंडारा-गडचिरोली.
- विदर्भात भुईमुगाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? नागपूर, वर्धा.
- विदर्भात मिरची उत्पादन अधिक प्रमाणात कोठे आढळते? नागपूर.
- दगडी कोळशाच्या खाणी नागपूर जिल्ह्यात कोठे आहेत? उमरेड-कामठी.
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया.
- विदर्भात एकूण क्षेत्रफळांच्या किती टक्के खनिजे आहेत? 12.33%.
- वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? शिवणी.
- मध्यप्रदेशात बैतुल जिल्ह्यात पूर्वभागातून कोणती नदी वाहते? वर्धा.
- कंहान, वर्धा, पैनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा.
- भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पुर्वभागातुन कोणती नदी वाहते? वैनगंगा.
- नागपूर जिल्ह्यात पाठनसावंगी सिलेवाडा येथे कशाच्या खाणी आहेत? दगडी कोळसा.
- मॅगनीजच्या सुमारे 200 खाणी भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत? भंडारा.
- नागपूर जिल्ह्यातील कंहान येथे कोणता धातू शुद्ध केला जातो? मॅगनीज.
- भंडारा जिल्ह्यात चीनी मातीचा उद्योग कोठे केला आहे? तुमसर.
- सर्वात कमी नागरी वस्ती कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली.
- युद्ध उपयोगी साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात कोठे उत्पादित होते? भद्रावती.
- कोणते शहर गांधीजीशी निगडीत आहे? वर्धा.
- अंबाझरी या तलावातून कोणत्या शहराला पानीपुरवठा होतो? नागपूर.
- सिताबर्डी किल्ला कोणत्या शहराचे वैशिष्ट्ये आहे? नागपूर.
- गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे कशाचा कारखाना आहे? कागद.
- नागपूरजवळ कंहान येथे कशाचा कारखाना आहे? कागद.
- विदर्भात हातमागाच्या गिरण्या कोठे आहेत? नागपूर.
- कोशा रेशीम साड्यासाठी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील कोणती गावे प्रसिद्ध आहेत? नागभीड, एकोडी.
- विदर्भातील कोणती गावे भाताच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तुमसर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा.
- तेंदूची पाने गोळा करण्याचा उद्योग विदर्भात कोठे चालतो? चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली.
- लोकरीपासून घोंगड्या कोठे तयार होतात? गडचिरोली.
- बांबुचा उद्योग कोठे चालतो? गडचिरोली, चंद्रपूर.
- नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? निलगाय व स्थलांतरील पक्षी.
- महाऔष्णिक विद्युत केंद्र विदर्भात कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर.