नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)

नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)

  • चंद्रपूर व भंडारा येथे कश्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? – तांदूळ.
  • कामठी येथे कशाच्या खाणी आहेत? – दगडी कोळसा.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता? – नागपूर.
  • तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते? – चंद्रपुर.
  • भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कोठे आहे? – तुमसर.
  • महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? – नागपूर.
  • कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते? – नागपूर.
  • रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? – मॅगनीज.
  • लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? – गडचिरोली.
  • सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? – मॅगनीज.
  • कायनाईटच्या खाणी कोठे आहेत? – देहुगाव-भंडारा.
  • क्रोमईट कोठे सापडते? – भंडारा.
  • अभ्रक कोठे मिळते? – नागपूर.
  • सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते? – नागपूर.
  • चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते? – तांबडी माती.
  • तापी व पूर्णा खोर्‍यात कोणती माती आढळते? – गाळमिश्रीत.
  • भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते? – उथळ व चिकन.
  • महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे? – तेलगु-गंगा.
  • इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारी राज्ये कोणती? – महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.
  • लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे? – आंध्रप्रदेश.
  • पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्‍यांने उभारला गेला आहे? – मध्यप्रदेश.
  • इडियाडोह योजना कोठे आहे? – भंडारा-चंद्रपूर.
  • बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? – भंडारा.
  • पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो? – नागपूर-भंडारा.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता? – भंडारा व गोंदिया.
  • बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे? – वर्धा.
  • रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? – नाग.
  • पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे? – वैनगंगा.
  • वैनगंगा नदी कोठे उगम पावते? – शिवणी.
  • वर्धा नदी कोणत्या पर्वतातून उगम पावते? – सातपुडा.
  • कंहान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? – वैनगंगा.
  • महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील महत्वाची नदी कोणती? – वैनगंगा.
  • कस्तुरचंद पार्क कोठे आहे? – नागपूर.
  • वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? – बोर.
  • देऊळगाव रेहुकरी अभयारण्य कोठे आहे? – अहमदनगर.
  • चंद्रपूर-भंडारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असूनही पणझडी प्रकारची अरण्ये आढळतात? – कारण उन्हाळ्यात हवेतील तसेच जमीनीतील आद्रता अतिशय कमी असल्याने वृक्षाची पाने गळून पडतात.
  • सांबर-चितळ प्राणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – चंद्रपूर.
  • कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत? – विदर्भ.
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल उत्पादन कशाचे होते? – जंगल-लाकूड.
  • विदर्भात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? – आर्द्र पानझडी.
  • नागपूर जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण कोणते? – रामटेक.
  • नॅशनल एनव्हायरमेंट इंजि.इन्स्टिट्यूट कोठे आहे? – नागपूर.
  • सेंट्रल पब्लिक हेल्थ इजि.रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? – नागपूर.
  • सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? – भंडारा.
  • मध्यवर्ती वस्तु संग्रहालय कोठे आहे? – नागपूर.
  • गोंडवन विभाग कोणत्या जिल्ह्यांना म्हणतात? – भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.
  • नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण किती आहे? – 100-300 सें.मी.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्र कोठे आहेत? – चंद्रपूर(दुर्गापूर).
  • कोराडी औष्णिक वीजकेंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? – नागपूर.
  • गडचोरोली जिल्ह्याच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारची माती आढळते? – जांभी-तांबडी माती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.