मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)

 • इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन आय.एन.एस. अश्विनी कोठे आहे? – मुंबई.
 • जसलोक रिसर्च सेंटर कोठे आहे? – मुंबई.
 • खार जमीन संशोधन संस्था कोठे आहे? – पनवेल.
 • समुद्र किनार्‍यावर बांधलेला किल्ला कोणता? – सिंधुदुर्ग-जंजीरा.
 • लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
 • कर्नाळा, मुरुड-जंजीरा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? – रायगड.
 • विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? – सिंधुदुर्ग.
 • वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
 • महाराष्ट्रातील एकूण मासेमारी पैकी किती टक्के मासे सुकवले जातात? – 50%.
 • कोणत्या जिल्ह्यात मासेमारी जास्त प्रमाणात चालते? – रत्नागिरी.
 • महाराष्ट्रातील मासेमारी पैकी किती टक्के मासे खार्‍या पाण्यातून मिळतात? – 80%.
 • मुंबईहून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र कोणते? – मुंबई समाचार.
 • जनशक्ती हे गुजराती वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – मुंबई.
 • जन्मशक्ती हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – मुंबई.
 • महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे? – मुंबई.
 • मुंबई समाचार हे कोणत्या भाषेतून प्रसिद्ध होते? – गुजराती.
 • रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कोणत्या खानी आहेत? – चुनखडी.
 • युसुफ मेहरअली सेंटर कोठे आहे? – पनवेल.
 • महाराष्ट्रातील कोणती महानगरपालिका ही पहिली होय? – मुंबई.
 • कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी कोठे आहे? – उत्तरेस.
 • ‘कोल्हापूर-गोवा’ या दरम्यान कोणता घाट लागतो? – फोंडाघाट.
 • चिनीमाती कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते? – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे.
 • शिसे व जस्त कोकणातील कोणत्या जिल्ह्यात जास्त मिळेल? – सिंधुदुर्ग.
 • खोपोली विद्युत केंद्र कोणत्या प्रकारचे आहे? – जलविद्युत.
 • फळापासुन विविध पदार्थ बनवण्याचे कारखाने कोठे आहेत? – रत्नागिरी.
 • पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? – मुंबई-चर्चगेट.
 • भाताच्या गिरण्या सर्वाधिक कोठे आहेत? – रत्नागिरी.
 • मासे डबाबंद करण्याचा उद्योग कोठे चालतो? – मुंबई, रत्नागिरी, मालवण.
 • कोकण विकास योजनेत किती जिल्हे मोडतात? – सहा.
 • नाव्हाशेवा बंदर कोठे आहे? – कोकण.
 • महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? – कर्नाळा.
 • महाराष्ट्राची वेधशाळा कोठे आहे? – मुंबई-कुलाबा.
 • कोकणात मिठाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? – रत्नागिरी, रायगड.
 • काँग्रेसचे शतक महोत्सवी अधिवेशन कोठे भरले होते? – मुंबई.
 • महाराष्ट्रात सर्वात जास्त युरेनियम कोठे सापडते? – रत्नागिरी.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.