Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2019

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल संपूर्ण माहिती

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल संपूर्ण माहिती

Must Read (नक्की वाचा):

गटविकास अधिकारी (BDO) बद्दल संपूर्ण माहिती


 • CEO हे भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात.
 • CEO ची निवड यु.पी.एस.सी. मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.
 • CEO हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात.
 • CEO वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते.
 • जिल्हा परिषदेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, कायदेविषयक तरतुदीचे जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करणे तसेच जिल्हा परिषदेने घेतलेल्या विविध निर्णयाची अंमलबजावणी करणे हे काम सी.ई.ओ. चे असते.
 • CEO हा जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाच्या अधिकार्‍यांची दोन महीने मुदतीपर्यंतची रजा मंजूर करू शकतो.
 • जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 व वर्ग 4 दर्जाच्या कर्मचार्‍याची नेमणूक करण्याचा अधिकार CEO ला असतो.
 • जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.
 • जिल्हा परीषदेतील महत्वाची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या ताब्यात असतात.
 • मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा गोपनीय अहवाल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष लिहीत असतो व तो अहवाल अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे पाठवित असतो.
 • जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
 • मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतो.
 • मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या कार्यावर जिल्हा परिषदेची प्रगति अवलंबून असते असे म्हणतात.
 • मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो.
 • मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
 • उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
 • उपमुख्य कार्यकरी अधिकार्‍याची निवड MPSC मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.
Must Read (नक्की वाचा):

राज्यघटनेतील परिशिष्टे


You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World