किशोरी शक्ती योजना
किशोरी शक्ती योजना
- आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत किशोरींना सक्षम बनविण्यासाठी सन 2000 पासून ‘किशोरी शक्ती’ योजना चालविण्यात येत आहे. यामुळे मुली आपली वाढ व पूर्ण क्षमतेचा विकास करून आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पार अप्डू शकतील.
- आयसीडीएसच्या आधारभूत संरचनेचा उपयोग करून सन 1992 पासून सुरु असलेल्या ‘किशोरी’ योजनेलाच ‘किशोरी शक्ती’ योजनेच्या रुपात पुन्हा सुरु करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दोन उप-योजना होत्या. 11ते 15 वर्ष वयोगटातील किशोरींना मुलीपर्यंत पोहचविणे तसेच 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलीना किशोरी पर्यंत पोहचविण्यासाठी बालिका मंडळ स्थापन करणे.
- पहिल्या उपयोजने अंतर्गत एकाच वेळी तीन किशोरींना 6 महिन्यासाठी अंगणवाडी केंद्राचे कामकाजात सहभागी केले जाते. किशोरी प्रथम पर्यवेक्षकाकडून तीन किशोरींना मूळ प्रशिक्षण घेते आणि त्यानंतर सहा महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.
- जेणेकरून ती अंगणवाडी केंद्र चालविण्यासाठी सक्षम होऊ शकेल. या काळात ती अंगणवाडी कार्यकर्तीला सेवा पुर्विण्यास्ठी मदत करीत असते.
- उपयोजना दोन अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सर्व योग्य मुलीमधून 11-18 वर्षाच्या 20 मुलीची ओळख केली जाते. बालिका मंडळात सेवा करण्यासाठी एकात्मिक बळ विकास सेवा योजनेंतर्गत केवळ 10% अंगणवाडी कार्याकर्तीची निवड केली जाते.
- बालिका मंडळ 11-18 वर्षाच्या 40 किशोरींना केटर करते. अंगणवाडी कार्यकर्ती बालिका मंडळासाठी नियमित मोफत निर्देशक म्हणून कार्य करीत असते. यामध्ये किशोरींना साक्षर बनवून त्यांना सर्वसाधारण शिक्षण दिले जाते.
- अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र व मध्यमस्थरीय प्रशिक्षण केंद्र तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशिक्षण केंद्राचे निर्देशक वेळोवेळी बालिका मंडळात येऊन आवश्यक शिक्षण देत असतात. या मुली बालिका मंडळातील कामात भाग घेतात आणि त्यांना तेवढाच पोषण आहार दिला जातो. जेवढा गर्भवती महिला व स्थनदा मातांना एका आठवडयात सहा दिवस दिला जातो.
- किशोरी शक्ती योजना ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडी केंद्रामार्फत आयसीडीएस प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे
किशोरी योजना – 1 मुलीपासून मुलींची कार्यपद्धती स्वच्छता, पोषण तत्व व शिक्षण (11 -15 वर्ष वयोगट) कार्यपद्धती |
(1) सरळ व व्यावहारिक संदेश (अ) प्रतिरोधक आरोग्य, (ब) अंगणवाडी केंद्राची (क) कुटुंब शिक्षण (2) पूरक पोषण आहार |
किशोरी योजना -2 बालिका मंडळ (11-18 वर्ष वयोगट) |
(1) खालील गोष्टीचे महत्व समजणे (अ) शिक्षण आणि जीवन कौशल्य (ब) व्यक्तिगत स्वच्छता (क) पोषण आहार व घराची देखभाल (उ) प्राथमिक आरोग्य, सांसर्गिक रोग लसीकरण प्रतिरोधक आजार (इ) कुटुंब जीवन, बाळाची देखभाल व विकास (ई) संवैधनिक अधिकार आणि त्यांचा जीवन गुणवत्ते वर प्रभाव (2) सकारात्मक कार्यामध्ये भाग घेणे व अनुभवाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून शिकणे आणि जीवनाला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यावर विचार करणे. (3) कौशल्य विकास (4) पूरक पोषण आहार |