केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोग

घटना कलम क्र. 315 नुसार केंद्र आणि राज्य सरकार यांना प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणार्‍या पदांच्या निर्मितीसाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकसेवा आयोगाचा अद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तीतके सदस्य असतात.

नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सल्ल्याने)

शपथ : राष्ट्रपती देतात

राजीनामा : राष्ट्रपतींकडे

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर राहतात.

लोकसेवा आयोगाचे कार्य :

  1. केंद्रसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
  2. केंद्रसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
  3. मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
  4. अधिकार्‍याची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी सरकारकडे सादर करणे.
  5. राष्ट्रपतीनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
You might also like
1 Comment
  1. Sandesh gade says

    Thanks ! for all these kind of information

Leave A Reply

Your email address will not be published.