इंद्रधनुष्य अभियान (Indradhanush Mission)

इंद्रधनुष्य अभियान (Indradhanush Mission)

*सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज/व्यवस्थापन सक्षम बनविणे व खाजगी क्षेत्रातील बँकांच्या समानतेमध्ये आणण्याच्या उद्देशाने “इंद्रधनुष्य अभियान” केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 14 ऑगस्ट 2015 रोजी जाहीर केले.

*इंद्रधनुष्य अभियान 7 कलमी यांनी अभियान म्हणून ओळखले जाते. ते पुढीलप्रमाणे –

खाजगी बँकांप्रमाणे नियुक्त्या –ज्याप्रमाणे खागजी बँकांमध्ये चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर पदे वेगळी असतात. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद वेगवेगळे करण्यात आले. यापुढे बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. ते पद भरून व्यवस्थापकीय संचालक पद या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे देण्यात येईल. याअंतर्गत पदाची निवड पद्धत सुधारित करण्यात आली असून ती अधिक पारदर्शक बनविण्यात आली.

बँक बोर्ड ब्युरो – (Bank Board Bureou)

1. बँक बोर्ड ब्युरोअंतर्गत अध्यक्ष आणि सहा सदस्य असतील.

2. अध्यक्षांची निवड ही सेवानिवृत्त बँकर किंवा बँकिंग माहिती असणार्‍या व्यक्तींमधून केली जाईल.

3. सहा सदस्यांपैकी 3 सदस्य सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील 3 सदस्य असतील.

सरकारी सदस्यांमध्ये

वित्त विभाग सचिव

RBI डेप्युटी गव्हर्नर

सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती अशा सदस्यांची नेमणूक RBI गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाईल.

*बँक बोर्ड ब्युरोच्या कामकाजाची सुरुवात 1 एप्रिल 2016 पासून झाली असून हा ब्युरो भरती आयोगाची जागा घेईल. त्याचबरोबर हा बोर्ड केंद्र सरकार आणि बँकांमधील दुवा म्हणूनही कार्यरत राहील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.