डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये लातूर येथे भरती, dic.gov.in वर अर्ज उपलब्ध
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन तर्फे प्रकल्प व्यवस्थापक व आयटी सल्लागार या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, लातूर येथील कार्यालयातील रिक्त जागांसाठी हि भरती होत आहे.
लातूर / मुंबई: भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमावर काम करणाऱ्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC Mumbai) या सरकारी नॉन-प्रॉफिट कंपनीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक व आयटी सल्लागार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लातूर येथील कार्यालयातील रिक्त जागा या भरतीद्वारे भरण्यात येणार असून त्यासाठी २१ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
प्रकल्प व्यवस्थापक व आयटी सल्लागार या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची गरज असून पात्रतेविषयी सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये वाचायला मिळेल. ठराविक मुदतीसाठी कंत्राटी पद्धतीने हि पदे भरनार आहे. सद्यस्थिती नुसार हि पदे २ वर्षाच्या कराराने कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून, प्रकल्पाचा कार्यकाळ वाढला तर त्यानुसार अधिकाऱ्यांचा कार्यकाळ देखील वाढविण्यात येईल.
लातूर येथील कार्यालयात या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, परंतु इतर प्रकल्पाच्या ठिकाणी देखील या अधिकाऱ्यांची भविष्यात बदली होऊ शकते असे नियमात आहे.
पदाचे नाव | प्रकल्प व्यवस्थापक व आयटी सल्लागार |
एकूण पदे | २ पदे |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया अधिकृत जाहिरात बघावी |
अर्ज पद्धती | ऑफलाईन अर्ज करायचा आहे |
नौकरी ठिकाण | लातूर, मुंबई |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ डिसेंबर २०१९ |
DIC मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा?
सर्व इच्छुक उमेदवारांनी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज डाउनलोड करावा. अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे. त्या अर्जातील सर्व माहिती अचूक भरून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (प्रशासन आणि वित्त), डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन, चौथा मजला, समृद्धी व्हेंचर पार्क, सेंट्रल एमएलडीडीसी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
My sichavesan be roj gari pilis govment job I m bharat sarkar and rikvesyou