बीड महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या १८८ जागांसाठी पदभरती जाहीर

mahavitaran bharti
महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहिरात

बीड: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, बीड येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी नौकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. आय.टी.आय वीजतंत्री (Electrician) व तारतंत्री (Wireman) पदांसाठी हि भरती होणार आहे. NCVT उत्तीर्ण झालेल्या (१०+२ या बंधामधील) उमेदवारांकडून एकूण १८८ पदांकरिता म.रा.वि.वि.कं.मर्या. संवसु मंडळ बीड करीता (बीड व अंबाजोगाई विभागाकरिता) दिनांक १० डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे महावितरण तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

हि भरती एकूण १८८ जागांसाठी होत असून ९४ जागा या वीजतंत्री पदासाठी तर ९४ च जागा तारतंत्री पदासाठी उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष अर्ज घेऊन तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित रहायचे असून त्यासंबंधी सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासंबंधी महत्वाची माहिती

  • दिलेल्या कालावधीमध्ये उमेदवाराने सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्ज व सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह प्रत्यक्ष मंडळ कार्यालय बीड येथे हजर राहायचे आहे.
  • कागदपत्रांमध्ये इयत्ता १० वीचे गुणपत्रक व सनद, आय.टी.आय गुणपत्रक व सनद, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, Apprentice रजिस्ट्रेशन प्रत व पासपोर्ट साईझ फोटो ई. चा समावेश होतो.
  • उमेदवारांचे Apprentice Portal वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे.
  • दहावी मध्ये प्राप्त गुण व आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी मंडळ स्तरावर प्रकाशित करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्र छाननी करिता १८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान बोलाविण्यात येईल.

वरील भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीतांस राहतील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला येथे क्लिक करून भेट द्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.